Crime news| मुलींनो, काकांपासून सावधान…

0
18
Murder scene theme vector illustration. All design elements are layered.

Ahmednagar |  अहमदनगरच्या जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका विवाहीत तरूणीला तिच्या सकख्या काकानेच हत्या करून संपवल्याचा प्रकार घडला आहे. माहेरी आलेली ही तरूणी घराबाहेर फोनवर एका दुसऱ्या मुलासोबत बोलत होती, हे बघून काका संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे समजले आहे. याप्रकरणात कोपरगाव शहर पोलीसांनी आरोपी असलेल्या काकाला अटक केली आहे.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या ह्या संतापजनक हत्येमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मृत तरूणीच्या आईने घाबरत पोलिसांत धाव घेत सर्व प्रकार सांगितला आहे. दरम्यान, कोपरगाव शहर पोलीसांनी प्रकरणातील आरोपी असलेल्या संतोष आरणे ( वय २६) ह्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी ह्या भागात हा प्रकार घडला आहे. येथे बुधवारी रात्री १२ च्या सुमारास आरोपी संतोष आरणे याने हल्ला केला. ज्यामध्ये पुतणीचा मृत्यू झाला आहे. मृत मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे, नेहा ही त्यांची २१ वर्षाची विवाहीत मुलगी गेल्या काही महिन्यांपासून माहेरी आलेली होती. बुधवारी रात्री ती घराबाहेर जाऊन एका दुसऱ्या मुलासोबत  बोलत होती. तेवढ्यात तिचा काका संतोष आरणे याने ते बघितले. त्याला तिच्यावर संशय आला, व तो संतापला व रागाच्या भरात तो थेट कुऱ्हाड घेऊन आला. आणि त्याने नेहाच्या दोन्ही पायांवर धारदार कुऱ्हाडीने सपासप वार केले तिला जबर जखमी केले. (Crime news)

Marriage news: धक्कादायक ! गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर करताय बलात्कार

हे लक्षात आल्यावर तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासांठी तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेले हते. परंतु, तेथील डॉक्टरांनी नेहाला मृत घोषित केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केलं जात आहे.

मृत तरूणीच्या आईच्या फिर्यादीनुसार कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने कार्यवाही केली असता. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपी असलेल्या संतोष आरणे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष आरणे याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ४९४/२३ भारतीय दंड विधान कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Maharashtra | CM एकनाथ शिंदे-राहुल नार्वेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here