Nashik | शहरातील हाय प्रोफाईल ‘रानबाजार’ उठवला; 8 कॅफे केले सील

0
3

Nashik | शहरातील आठ कॅफे महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत बुधवारी सील करण्यात आलेली आहेत. कॉलेज रोड, गंगापूर रोडसह गोदावरी नदीकाठावरील 8 कॅफे बुधवारी (दि. १८) सिल करण्यात आले आहेत. शहरातील अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे कॅफेंचे चालक आणि प्रेमवीरांचे मात्र धाबे दणाणले आहेत. सिन्नर येथील 3 कॅफेंमध्ये सोमवारी लैंगिक अत्याचार होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर मंगळवारी नाशकातील इंदिरानगर हद्दीतील 4 कॅफेंवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. या कारवाईनंतर शहरातील सर्वच कॅफे महापालिका आणि पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत.

Lalit Patil Case| ललित पाटील ज्या महिलेला भेटला; ती महिला कोण?

शहरात MD DRUGS चा राज्यातला सर्वांत मोठा कारखाना उद्ध्वस्त झाल्यानंतर नाशिक नशेचे नवे हब बनल्याचं पहायला मिळत आहे. या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार ललित पानपाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर हे प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. हे प्रकरण कमी होत नाही तोच नाशकात कॅफेंच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नाशकातील कॉलेज रोड, गंगापूर रोड भागात बुधवारी सायंकाळी अचानक काही कॅफेंवर धाड टाकण्यात आली आणि यात आठ कॅफेंमध्ये अय्याशीच्या अनेक सुविधा आढळल्याने यंत्रणादेखील चक्रावली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी ही कारवाई केली आहे. कॅफेंमध्ये केवळ अमली पदार्थच नव्हे,  तर सिगारेट तसेच अनधिकृतपणे हुक्कादेखील उपलब्ध करून दिला जात असल्याच्या तक्रारी पोलिस प्रशासनाकडे आल्या आहेत.

कोणते कॅफे झाले सील ? 
सिझर कॅफे, एस. के. मॉल, हॉलमार्क चौक, कॉलेज रोड
यारी कट्टा, कटारिया ब्रिज, सुयोजित कॉम्प्लेक्स
कॅफे क्लासिक डे लाइट, सुयोजित कॉम्प्लेक्स
हॅरीज किचन कॅफे, सुयोजित कॉम्प्लेक्स

पॉकेट कॅफे, श्रद्धा मॉल, कॉलेज रोड

मुरली कॅफे, महात्मानगर
मॅजिक वर्ल्ड कॅफे, शॉप नं. ४, डीकेनगर, गंगापूर रोड
वालाज कॅफेटेरिया, श्रद्धा मॉल, कॉलेज रोड

पालकमंत्र्यांच्या भूमिकेने नागरिक सुखावले

कॉफी शॉपमध्ये अनाधिकृतपणे कंपार्टमेंट पार्टीशन तयार करून तरूण-तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरवुणे सदर ठिकाणी अंमली पदार्थांचे – सेवन आणि अश्लिल कृत्यांना आसरा दिला जात आहे.  याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. या अनुषंगाने गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत 8 कॅफे शॉपवर कारवाई करण्यात आली. पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांची संयुक्त पथकं निर्माण करून अनाधिकृतपणे कंपार्टमेंट/पार्टीशन तयार करून तरूण-तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरविणाऱ्या एकुण 8  कॉफी शॉप मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आले आहे. तसेच सदरचे कॅफे महानगरपालिकेकडुन सील करण्यात आले आहेत.  सदर पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान परिमंडळ- १ हद्दीत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या 250 इसमांविरुध्द आणि परिमंडळ-२ हद्दीतील 99 इसमांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी शाळा/महाविदयालयातील मोकळ्या पटांगणात धुम्रपान करणारे तसेच तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एकुण 33 इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. यामुळे टवाळखोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here