Lalit Patil Case| : ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर दोन वेळेस नाशिकमध्ये आल्याचे समोर आलेळे आहे. यात तो नाशिकमध्ये एका महिलेला भेटला होता. येथेच तो भूषण पाटीलला भेटला व त्याच्याकडून २५ लाखांची रक्कम घेऊन पसार झाला असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित ह्या महिलेलादेखील नाशिक पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून सात किलो चांदी मिळाली आहे.
ड्रग्ज प्रकरणात वेगवेगळे मोहोरे समोर येत असून पंधरा दिवसांनंतर अखेर फरार असलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी ललित पाटील ह्या पंधरा दिवसात कुठे गेला होता याबाबतकहा शोध घेण्यात येत आहे. यादरम्यान, ससूनमधून फरार झाल्यानंतर ललित पाटील दोनदा नाशिकमध्ये आला होता. या दरम्यान तो एका महिलेला भेटला. भाऊ भूषण पाटील याने त्याच महिलेकडे २५ लाख रुपये आणून दिले होते. तेच पैसे घेऊन ललित पाटील पुन्हा नाशिकमधून पसार झाला होता. ही धक्कादायक बाब पोलिस तपासातून समोर आली आहे. यानंतर ललित एका दिशेला तर त्याचा भाऊ भूषण पाटील दुसऱ्या दिशेला पसार झाले होते. पण, तीन दिवसांपूर्वी त्याचा भाऊ भूषण पाटील याला पोलिसांनी अटक केली तर काल ललित पाटीलच्याही मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
Dada bhuse: पालकमंत्री भूसेंच्या आक्रमक भूमिकेने नाशिक शहरात पोलिसांची धडाकेबाज कारवाई
नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी ललित पाटील नाशिकला कोणाकोणाला भेटला याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, आमच्याकडे १२ ग्रॅम एमडीच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता. त्यातील ३ आरोपी अटकेत होते, तर चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, २ आणखी नवे समोर आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत एक गोडाउनमध्ये ड्रग्स सापडल्याप्रकरणी ३ आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून, ललित पाटील प्रकरणाचा तपास नाशिक पोलीसही करत होते. दरम्यान, ललित फरार झाल्यानंतर नाशिकला आल्याचे समोर आले असता. तो नाशिकधील एका महिलेकडे वास्तव्यास होता. यावेळी ह्या महिलेतर्फे पैशांची देवाणघेवाण झाल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित महिला ही पुणे पोलिसांच्या ताब्यात असून तिच्याकडून ७ किलो चांदी ताब्यात घेण्यात आली आहे. पण अजूनही नेमकी ही महिला कोण आहे ? हे समजलेले नाही.
आई वडिलांना अश्रू अनावर
यादरम्यान, ललित आणि भूषण पाटीलचे आईवडील म्हणाले की, “आमची मनस्थितीच नाही, काहीही बोलण्याची, ललित गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात होता. त्यामुळे आमचा त्याच्यासोबत काहीच संपर्क नव्हता. त्यामुळे त्याने हे ड्रग्ज रॅकेट कधी सुरू केलं, याबद्दल आम्हाला काही माहिती नाही जर आम्हाला याबाबतची माहिती असती तर आम्ही नक्कीच त्याला समजावल असतं की, हे करू नको, मात्र आम्हाला ह्या दीड वर्षात काय चाललंय, याची कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती, असेही ते म्हणाले. आमचे दोन्ही मुलं असं काही तरी करतील, असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. गेल्या तीन वर्षात आम्ही त्याला कधी भेटलो ही नव्हतो, आम्ही त्याला सोडूनच दिलं होतं, अशी मुलं नसेलेली बरी, यावेळी ललित आणि भूषण पाटीलच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. (Lalit Patil Case)
Lalit Patil Case| ‘मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलंय’ : ललित पाटील
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम