OnePlus Open फोल्डेबल फोन भारतात लाँच; सॅमसंगला टक्कर

0
1

वनप्लस कंपनीने फोल्ड स्मार्टफोन रेंजमध्ये पदार्पण केलेलं आहे. या कंपनीचा नवीन डिवाइस OnePlus Open नावाने भारतासह जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा वनप्लस कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन आहे. या कंपनीने फोनमध्ये दर्जेदार स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत. ज्यात 16 GB रॅम+ 512 GB स्टोरेज, स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर, ट्रिपल कॅमेरा सेटअप तसेच ड्युअल सेल बॅटरीचा समावेश आहे.

OnePlus Open ची किंमतवनप्लस ओपनचा एकमेव 16 GB रॅम+ 512 GB स्टोरेज ऑप्शन 1,39,000 रुपयांमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन कालपासून (दि.१९) प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. हा डिवाइस 27 ऑक्टोबरपासून विकला जाईल. वनप्लस कंपनी ICICI आणि वन-कार्डवर 5,000 रुपयांपर्यंतचा इंस्टंट बँक डिस्काउंट देण्यात आला आहे. तसेच डिवाइसवर 12  महीने पर्यंतचा इंटरेस्ट फ्री EMI चा ऑप्शन देखील मिळणार आहे.हे देखील वाचा : Nashik News| ललित पाटीलकडून ‘मातोश्री’ वर हप्ते जात होते का? ; देवयाणी फरांदेंचे घणाघाती आरोप…
OnePlus Open चे स्पेसिफिकेशन्सOnePlus Open च्या Back Pannel वर एक सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यात Triple rear camera setup आणि Hasselblad ब्रँडिंग आहे. या डिवाइसच्या डावीकडे एलइडी फ्लॅश आहे. ह्याचे डायमेंशन अनफोल्ड झाल्यावर 153.4mm x 143.1mm x 5.8 mm आणि वजन 239 GRAM आहे. वनप्लसच्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 7.82 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तर सेकंडरी डिस्प्लेची साइज 6.3 इंच आहे. दोन्ही स्क्रीन 120 हर्टझ रिफ्रेश रेट आणि 2440×2268  पिक्सल २के रिजोल्यूशनला सपोर्ट करत आहेत. OnePlus Open मध्ये अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजन ओएस 13.2 वर आहे.

फ्लॅगशिप परफॉर्मन्ससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट वापर करण्यात आलेला आहे. हा चिपसेट 3.36 गिगाहर्ट्झ क्लॉक स्पीड आणि 4 नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो. सोबत ग्राफिक्ससाठी एड्रेनो 740 जीपीयू देण्यात आला आहे. डाटा स्टोर करण्यासाठी वनप्लस ओपनमध्ये ब्रँडनं 16 जीबी पर्यंत एलपीपीडीडीआर 5 एक्स रॅम आणि 512 GB पर्यंत यूएफएस 4.0 इंटरनल स्टोरेज आहे. तसेच रॅम वीटा टेक्नॉलॉजीच्या मदतीने 12 GB पर्यंत अतिरिक्त रॅम मिळतो.

वनप्लसच्या नवीन फोल्ड स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 3 एक्स ऑप्टिकल झूमसह 64 मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आलेला आहे. फोनमध्ये 20 मेगापिक्सल आणि 32 मेगापिक्सल असे दोन सेल्फी कॅमेरे दोन डिस्प्ले वर आहेत. वनप्लस ओपन मध्ये 3295 + 1510  अशी 4805  एमएएचची ड्युअल सेल बॅटरी आहे.  G67 वॉट सुपरवूक चार्जिंगला सपोर्ट करते.  कंपनीचा दावा आहे की डिवाइस फक्त 42 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी डुअल सिम 5G , Wi-fi, Bluethooth, GPS सारखे अनेक फीचर्स देण्यात आलेले आहेत.  त्याचबरोबर साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, एंबिएंट लाइट सेन्सर,  एक्सीलरोमीटर,  नॉइज कॅन्सलेशन सपोर्ट, अलर्ट स्लाइडर, डॉल्बी ॲटमॉस सपोर्टचा देखील समवेश करण्यात आलेला आहे.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here