Big News | एका WhatsAppवर दोन अकाउंट्स वापरता येणार; झुकरबर्ग लवकरच आणणार नवं फीचर

0
2

Big News | ‘मेटा’चे इन्स्टंट मेसेजिंग ॲप  WhatsApp आपल्या यूजर्ससाठी ड्युअल अकाउंट फीचर घेऊन येत आहे. हे फीचर लवकरच प्रत्येकासाठी आणले जाणार आहे. त्यानंतर वापरकर्ते फोनच्या एका WhatsApp मध्ये दोन वेगवेगळ्या नंबरसह अकाउंट तयार करू शकणार आहे. या फीचरमध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या ॲप्सप्रमाणे एका ॲपमध्ये दोन अकाउंटमध्ये लॉग इन करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे.

‘मेटा’चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी फेसबुक पोस्टमध्ये व्हॉट्सॲप​​​​​​​च्या या आगामी फीचरची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी एक स्क्रीनशॉटदेखील शेअर केलेला आहे. ज्यामध्ये अकाउंट स्विच करण्याचा पर्याय दिसतो आहे.

Ajit Pawar| अजित दादा पुन्हा बनले ‘ अँग्री मॅन’…

ड्युअल व्हॉट्सॲप खाते कसे काम करेल?

  1. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्युअल व्हॉट्सॲप​​​​​​​ अकाउंट फीचर वापरण्यासाठी यूजर्सकडे ड्युअल नंबर सपोर्ट असलेला फोन असणे आवश्यक आहे.
  2. अपडेट रोल-आऊट झाल्यानंतर यूजर्सना व्हॉट्सॲप​​​​​​​च्या सेटिंग्जमध्ये ‘Add Account’ चा पर्याय मिळणार आहे.
  3. या पर्यायाद्वारे, वापरकर्ते एका ॲप​​​​​​​मध्ये दोन खाती तयार करू शकतील आणि दोन्ही खात्यांसाठी वेगवेगळे सेटिंग्ज कस्टमाइझ करू शकतील.
  4. Nashik | उबाठा गटाच्या मोर्चात भाडोत्री गर्दी? मोर्चा कसला हेच ठावूक नाही….

पेटीएमच्या सीईओने व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरचे केले कौतुक

पेटीएमचे सीईओ आणि संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी व्हॉट्सॲप​​​​​​​च्या या नवीन फीचरचे कौतुक केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टला उत्तर देताना त्यांनी लिहिले आहे की,

‘नवीन फीचर भारतीय बाजारपेठेसाठी गेम चेंजर ठरू शकते’.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here