Uddhav Thackrey | कालपासूनच राज्यभरात चर्चा असलेली उद्धव ठाकरे यांची आज ‘महापत्रकार परिषद’ आज दुपारी ४ वाजता सुरू झाली आहे. या परिषदेत दिल्लीतील काही मोठे कायदेतज्ञ, वकील देखील उपस्थित आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावर भाष्य करणार आहेत. तसेच या परिषदेत आता काही गौप्यस्फोट देखील होण्याची शक्यता आहे. ‘जनता न्यायालय’ असे या महापत्रकार परिषदेला नाव देण्यात आलेले असून, “सत्य ऐका आणि विचार करा” असे ब्रीदवाक्यही देण्यात आलेले आहे.Uddhav Thackrey
Uddhav Thackrey| राहुल नार्वेकर यांचा लवाद असा उल्लेख
आजच्या ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेची सुरुवात ही संजय राऊत यांनी केली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ‘लवाद’ असा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की. “या लवादाने शिवसेना चोर लफंग्यांच्या हातात दिली. त्याने दिलेला निर्णय हा त्यांची बायकोही मान्य करणार नाही. आम्ही कायद्याचे पालन केले. आम्ही इमानदारीने लढलो आणि तुम्ही बेईमानीने जिंकले. आजच्या या न्यायालयात जनताच न्यायमूर्ती आहे.
आज जो निकाल तुम्ही द्याल तोच निर्णय ४ महिन्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीतही तुम्ही द्याल याची आम्हाला खात्री आहे. कदाचित त्या लवादाला मोतीबिंदू झाला असेल, किंवा त्याला काही ऐकू येत नसेल. म्हणून त्याला हे पुरावे दिसले नाही. अशा बेईमानांच्या बाजूने निकाल दिलात तर, यापुढे कोणीही न्यायालयात जाणार नाही, असही खोचक टिक यावेळी खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर आणि त्यांच्या निर्णयावर केली आहे.
Uddhav Thackrey | ….अन् आता राऊतांनी थेट मोदींचीच हिम्मत काढली
पक्षांतराची बेकायदेशीर बाराखडी म्हणजे नार्वेकरांचा निर्णय
या परिषदेत ॲड. असीम सरोदे यांनी कायदेविषयक बाबी मांडल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की, “वकीलाने सहसा कोर्टातच बोलावं असं म्हणतात पण आज मी या जनतेच्या न्यायालयात बोलणार आहे. आज शिवसेनेच्या प्रकरणाची चिरफाड करणार आहे. आज इथे फक्त सत्य मांडणार आहोत. १० वं परिशिष्ठ हे राजकारणावर आधरीत आहे. फडणवीस आणि शिंदेचे आभार की, ‘पक्षांतर बंदी’ या कायद्याचं त्यांनी प्रबोधन केलं.
या देशातील प्रत्येक नागरिकाने राजकारणावर बोललं पाहिजे. उद्धव ठाकरे हे संविधानाच्या बाजूने आहेत म्हणून मी त्यांची बाजू घेतो. विधिमंडळ पक्ष हा अस्थायी संस्था असते. कारण विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे पाच वर्षाच असतं. त्यामुळे याला काही महत्व नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना हाच मूळ पक्ष आहे. ॲड. असीम सरोदे यांनी कायदेशीर बाबींची पडताळणी केली आहे.
Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे म्हणजे ‘सेल नसलेला रिमोट’!; कोण काय म्हणाले..?
शिवसेनेचे सर्व ४० आमदार हे अपात्र ठरले पाहीजे. राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचा विश्वासघात केला आहे. मनाला येईल तसा कायद्याचा अर्थ काढता येत नाही. असा न्याय होणार असेल तर, पुढील येणारी पिढी कायद्यावर विश्वास ठेवेल का ? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं कि, विधानसभा अध्यक्ष या बाबत निर्णय घेतील. कोणत्याही पक्षाचं प्रभाव न ठेवता अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलं होतं. नार्वेकारंनी सुप्रीम कोर्टाच्या सूचना पाळल्या नाहीत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले लोक हे कुठल्याही पक्षात सामील झाले नाही म्हणून ते अपात्रच, अशा शब्दांत असीम सरोदे यांनी निर्णयावर कायदेशीर वक्तव्य केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम