Uddhav Thackrey | …अन् ठाकरेंच्या परिषदेत लावला ‘तो’ व्हिडिओ

0
34
Uddhav Thackrey
Uddhav Thackrey

Uddhav Thackrey | कालपासूनच राज्यभरात चर्चा असलेली उद्धव ठाकरे यांची आज ‘महापत्रकार परिषद’ आज दुपारी ४ वाजता सुरू झाली आहे. या परिषदेत दिल्लीतील काही मोठे कायदेतज्ञ, वकील देखील उपस्थित आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावर भाष्य करणार आहेत. तसेच या परिषदेत आता काही गौप्यस्फोट देखील होत आहेत. ‘जनता न्यायालय’ असे या महापत्रकार परिषदेला नाव देण्यात आलेले असून, “सत्य ऐका आणि विचार करा” असे ब्रीदवाक्य आहे.(Uddhav Thackrey)

Uddhav Thackrey | लवादाला मोतीबिंदू झाला म्हणून पुरावे दिसले नाही; पत्रकार परिषदेत राऊत गरजले

Uddhav Thackrey | अनिल परबांकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’

दरम्यान, आता ॲड. अनिल परब यांच्याकडून २०१३ च्या राष्ट्रीय कार्यकरिणीचा ठरावाचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी सर्व कागदपत्रे ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिली होती. नार्वेकरांनी स्वताला कोर्टापेक्षा वरचढ दाखवलं असल्याची टिका यावेळी अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली आहे. दरम्यान, त्यांनी यावेळी दाखवलेल्या व्हिडिओ च्या माध्यमातून पुढील ठराव मांडले आहेत.

Manoj Jarange | मनोज जरांगेंवर हत्येचा गुन्हा दाखल करा; सदावर्ते पुन्हा बरळले

Uddhav Thackrey | असे आहेत ठराव

१. पहिला ठराव – शिवसेना पक्षप्रमुख ही संज्ञा गोठवण्याचा पहिला ठराव.

२. दुसरा ठराव – सर्वाधिकार हे पक्षप्रमुखालाच असेल हा हा दुसरा ठराव.

३. तिसरा ठराव – वर्किंग प्रेसिडेंटला सर्वाधिकार असतील हा तिसरा ठराव.

या सर्व बाबी ॲड. अनिल परब यांनी शिवेसेनेच्या २०१३ मधील घटना दुरुस्तीच्या वेळीचे व्हिडिओ दाखवत मांडले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here