Uddhav Thackeray | असा असेल उद्धव ठाकरेंचा ‘नाशिक दौरा’

0
25
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | संपूर्ण देशभरात सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचीच चर्चा आहे. या सोहळ्याची देशवासीय आतुरतेने वाट पाहत आहेत. जगाच्या नजरा या अभूतपूर्व सोहळ्याकडे लागलेल्या असून, देशात सध्या भक्तिमय वातावरण पसरले आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी देशभरातील सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळींना आमंत्रण देण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेगळी वाट धरली असून, ते यादिवशी नाशिकमध्ये येऊन काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत.

तसेच, यावेळी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन भरणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी हे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी ठाकरे गटाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याचे नियोजन कसे असेल? याची संभाव्य माहिती समोर आली आहे.

१२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आलेले होते. त्यावेळी त्यांनीही नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले आणि साफसफाई देखील केली होती. दरम्यान, आता उद्धव ठाकरेही नाशिकमध्ये येऊन दर्शन घेणार आहेत. तसेच ते यावेळी गोदा आरतीही करणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक भगुर येथे जाऊन अभिवादनही करणार आहेत.(Uddhav Thackeray)

Shivsena | आता उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ ही जाणार..?

Uddhav Thackeray | असा असेल ठाकरेंचा दौरा 

अधिक माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांचा २२ जानेवारी रोजीचा नाशिक दौरा हा पुढीलप्रमाणे असेल.

१. उद्धव ठाकरे हे सकाळी ११ वाजता मुंबईहून निघतील.

२. त्यानंतर विमानाने ते ओझर विमानतळावर येतील.

३. दुपारी १ वाजता ते ओझरहून भगूर येथे जातील. तेथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन ते अभिवादन करणार आहेत.

४. दुपारी २ वाजता ते भगूरहून रॅडिसन ब्ल्यू  हॉटेलकडे रवाना होतील.

५. त्या दिवशीच संध्याकाळी ५.३० वाजता ते काळाराम मंदिरात जातील. तेथे दर्शन घेऊन ते पूजा करतील.

६. ६.३० वाजता गोदा घाटावर ते गोदा महाआरती करणार आहेत.(Uddhav Thackeray)

Shivsena | जे सुप्रीम कोर्टाला अमान्य ते सारे नार्वेकरांच्या कोर्टात मान्य

अधिवेशनात गरजणार 

दरम्यान, यानंतर दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त ठाकरे गटाचे हे महाअधिवेशन नाशिकमध्ये सुरु होणार आहे. १० ते २ वाजेपर्यंत पक्षाचे प्रमुख वक्ते बोलणार आहेत. त्यानंतर शिबिराचा समारोप हा उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेच्या सुरुवातीला जागरण गोंधळाचा कार्यक्रमही होणार आहे. आता नाशिकमध्ये येऊन उद्धव ठाकरे नेमके कोणावर निशाणा साधतील?, आणि यादरम्यान काही महत्त्वाच्या घडामोडी होणार का? हे पहावे लागणार आहे.(Uddhav Thackeray)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here