Manoj Jarange | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा नेते मनोज जरांगे हे आंदोलन करत आहेत. त्यांनी मागे दोन वेळेस उपोषणही केले होते. मात्र. दोन्ही वेळी सरकार कडून त्यांना दोन वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या होत्या. दोन्ही वेळी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण केले होते. मात्र, आता यावेळी ते थेट मुंबईत जाऊन उपोषण करणार आहे आणि यात सकल मराठा समाजाने सामील होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (Manoj Jarange)
त्यानुसार, आज ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. दरम्यान, मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र, यावेळी मनोज जरांगे यांना गहिवरून आले होते. भर पत्रकार परिषदेत ते ढसाढसा रडले. स्वतः सेनापतीच भावूक झाल्याचे पाहून इतर उपस्थित आंदोलकांच्याही डोळ्यात अश्रु तरळले. “आता आम्हाला गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही.” असे मनोज जरांगे म्हणाले.
Manoj Jarange | मनोज जरांगेंची राजकारणात एन्ट्री?; वाचा प्रकरण काय
काही वेळातच जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. यासाठी मोठी जय्यत तयारी ही गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. निघण्यापूर्वी मनोज जरांगेंनी पत्रकारांसोबत संवाद साधला, यावेळी ते भावूक झाले. मात्र, स्वतःला सावरत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.(Manoj Jarange)
Manoj Jarange | काय म्हणाले मनोज जरांगे..?
“आमरण उपोषण आणि मुंबईकडे जाण्याची घोषणा करून आता एक महिना झाला. तरीही सरकार हे गांभीर्याने घेत नाही. एवढा निर्दयपणा त्यांच्या अंगात असणं म्हणजे हा आता अन्यायाचा कळस झाला. त्यामुळे शेवटी आता मराठे शांततेचं अस्त्र हातात घेऊन, यांचं भविष्य कायमचं संपवल्याशिवाय थांबणार नाही. कारण आपल्याच मुलांच्या नरड्यावर पाय द्यायचंच यांनी ठरवलेलं असेल, तर आपले मुलं मोठे होऊ नये असंच यांनी ठरवले असेल, त्यामुळे आता त्यांचं राजकीय आयुष्य हे कायमचं सुपडासाप केल्याशिवाय चालणारच नाही, असे आव्हान जरांगे यांनी सरकारला दिले. याचवेळी बोलताना जरांगे यांना रडू कोसळले. (Manoj Jarange)
Manoj Jarange | मनोज जरांगेंवर हत्येचा गुन्हा दाखल करा; सदावर्ते पुन्हा बरळले
आंदोलकांमध्ये उत्साहाचे वातावरण
आज जरांगे हे अंतरवाली सराटीहून मुंबईकडे रावाना होत आहेत. यावेळी आंदोलकांमध्ये मोठा उत्साह दिसुन आला. पुढच्या काही वेळात मनोज जरांगे हे आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेला निघतील. यापूर्वी गावात आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून मराठा आंदोलक हे काल रात्रीपासून आंतरवालीत दाखल होत आहेत.
पोलिसांचा फौजफाटा
मुंबई येथे दाखल होण्याची तयारी मराठा आंदोलकांकडून सुरू असून, मुंबईला जायचा मार्ग कसा असेल?, कुठे मुक्काम असतील?, आंदोलकांनी सोबत काय काय घायायचे?, यासह संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या मार्गावर आधीच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता आंतरवाली सराटी येथूनच या मार्गावर पोलीस बंदोबस्त आहे. तसेच, आंदोलनात सीआयडी, एसआयडी, आयबी या पथकांचे अधिकारीही सहभागी असणार आहेत.(Manoj Jarange)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम