Maratha Breaking | जरांगे-सरकारमधील ताण वाढणार? जरांगे हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना

0
3
Maratha Breaking
Maratha Breaking

Maratha Breaking | मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात गाजत असून आता मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी ११ वाजता मुंबईकडे कूच केली असून यावेळी जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथून हजारोंच्या संख्येने मराठा समाज जरांगेंसोबत निघालेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे अंतरावाली सराटीतून निघाल्यावर त्यांना गहीवरून आल्याचं पाहायला मिळालं.

Deola | केदा आहेरांमुळे पहिल्यांदाच देवळ्याला शेतकरी संघाच्या नेतृत्वाची संधी

Maratha Breaking | सरकराने जरांगेंशी बोलु नये असा सुर

यातच, आता एक मोठी अपडेट समोर येत असून मनोज जरांगे यांच्या सततच्या बदलत्या मागण्यांमुळे सरकारमध्ये नाराजी असल्याचं कळत आहे. तसेच सरकराने जरांगेंशी बोलु नये असा सुर आता सरकारमधील काही नेत्यांकडून ऐकू येत आहे. पुढील महिन्यात सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन घेणार असून राज्यातील कुणबी नोंदी देखील काढण्यात येत आहे. असं असताना देखील जरांगेना मुंबईला येण्याची गरज काय? अशी कुजबुज सध्या सरकारमध्ये असल्याचं कळत आहे.

मनोज जरांगे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मुबंईला जाण्यास सुरूवात केली असून यावेळी बोलताना त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. तसेच २६ जानेवारी रोजी मुंबईतील गल्ली-गल्लीत मराठा दिसायला हवेत आणि दरम्यान, गोळ्या घातल्या तरीही आता मी मागे हटणार नाही. मी मराठा समाजासाठी मी लढत असून मराठ्यांनी आरक्षण घेण्यासाठी माझ्यामागे पुन्हा एकदा ताकदीने उभे रहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मोर्च्याच्या प्रारंभीस केले आहे.

Deola | ज्यांनी केली कांदा निर्यातबंदी त्यांनाच करा मतदान बंदी – गणेश निंबाळकर

Maratha Breaking | मुंबईकडे कूच करण्यापुर्वी त्यांना अश्रू अनावर…

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्यापुर्वी त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. तसेच यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,  सरकार किती निष्ठूर असून अनेक वर्षांपासूनच्या मराठा समाजाच्या आंदोलनात शेकडो जण शहीद झालेले आहेत. मात्र तरीही सरकारला जाग आली नाही आणि मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. हे मराठा आंदोलनाचे हे दिवस आठवून आपल्या डोळ्यात पाणी आल्याचे जरांगेनी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here