Uddhav Thackeray | निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर? जुन्या पेन्शन योजनेबाबत उद्धव ठाकरेंच मोठं वक्तव्य

0
62
#image_title

Uddhav Thackeray | शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. “आपले सरकार आणा. मी तुमची जुनी पेंशन योजना सुरु करू.” असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी यावेळी केले. त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणेला पाठबळ दिले. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत.

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्याला न्यायालयाने फटकारले; ठोठावला 2 लाखांचा दंड!

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

“उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आपण सर्व कुटुंब आहोत. आमच्या बहिणींना, भावांना न्याय द्या. असे साकडे मी साईबाबांकडे घातलं आहे. माझे वडील, माझा पक्ष चिन्ह सगळ चोरलं गेलं आहे. मला दिवारचा डायलॉग आठवतोय!मेरे पास इमान है, विश्वास है. फोडाफोडीच्या राजकारणाला बळी पडू नका. आमच्या सोबत झालंय ते तुमच्या सोबतही होईल. यांना टेन्शन द्या. उपोषणाची हाक द्या, पण ते करू नका. आधीच उपाशी आहेत, यांना सत्तेपासून उपाशी ठेवा.” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

“लाडकी बहीण योजना आणली. आपलं सरकार आणा. मी तुमची जुनी पेन्शन योजनेची मागणी पूर्ण करतो. मला किती पेन्शन मिळणार माहित नाही. पण मी अजून रिटायर झालो नाही आणि सत्तेतून रिटायरही होणार नाही. माझा महाराष्ट्र हा माझ्यासाठी तुमच्यासारखी हाडामासाची माणसं आहेत. आम्ही कंत्राटी तुम्ही सरकार चालवता. कोविडमध्ये तुम्ही नसता तर महाराष्ट्र टिकला नसता. मी तुझा भाऊ आणि हे फुकट खाऊ. हे उपटसुंबे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

Uddhav Thackeray | ‘संजय राऊत माझा पाठलाग करायचे’; गंभीर आरोप करत महिलेने ‘उद्धव दादां’कडे मागितला न्याय

“दिल्लीला विचारल्याशिवाय हे काहीही करू शकत नाहीत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही. तुम्हाला वाटतं हे घोषणा करतील? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी टीका केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील मंचावर उपस्थित होते. तेव्हा त्यांना उद्देशून “आता पुढचा बॅट्समन आलाय, मी चौके, छक्के लगावले आहेत आता तुम्ही लावा. जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याचा माझा शब्द आहे. शब्दाला ताकद देण्याची जबाबदारी आता तुमची आहे.” असे देखील ठाकरे यांनी म्हटले.

नाना पटोलेंनीही केली जुन्या पेन्शन योजनेबाबतची घोषणा

“हे सरकार आता सत्तेबाहेर जाणार आहे. राज्यावर दहा लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. मंत्री देखील आता तुमच्याकडे येणार अशी माहिती मला मिळाली आहे. आमच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेऊ जाहीरनाम्यात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा राहील.” असं म्हणत नाना पटोले यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेला पाठबळ दिलं.

” वाजपेयींच्या काळातच या योजनेला खोडा लागायला सुरुवात झाली होती आणि त्याचे आरोप मात्र काँग्रेस वरती करण्यात आले. जिथे आमचे सरकार होते तिथे पेन्शनचा निर्णय झाला, पण राजस्थानमध्ये योजना लागू करूनही आमचे सरकार गेले. तेव्हा आमच्यावर आरोप करतात की आम्ही ही योजना बंद केली. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासूनच याची सुरुवात झाली होती. देशात जिथे आमचं सरकार आहे. तिथे आम्ही जुनी पेन्शन योजना सुरू करणार. लोकसभा निवडणुकीत जो निर्णय आला त्यात तुमचं मोठं योगदान आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तुमची साथ असू द्या. तुम्हाला टेन्शन देणारा आता आमच्यात राहिला नाही. त्याला दुर्बुद्धी येऊन तो तिकडे गेला. ” असा खोचक टोला नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यावेळी लगावला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here