BJP | सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धुमाळी पाहायला मिळत असताना, अनेक नेत्यांची इन्कमिंग आणि आउटगोइंग सुरू आहे. त्यातच भाजपला आता अजून एक मोठा फटका बसला आहे. त्यापूर्वीच निवडणुकीच्या तोंडावरच कागल मधील समरजीत सिंग घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकला त्यानंतर आता विदर्भातील एका बड्या नेत्याने देखील भाजपची साथ सोडली आहे. तीन वेळा गोंदियाचे आमदार म्हणून निवडून आलेले गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
BJP | भाजपला मोठा फटका; बावनकुळेंच्या विधानाने चर्चांना उधान
अग्रवालांनी 2019 मध्ये केला होता भाजपत प्रवेश
2019 सालामध्ये माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस मधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. पण अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला होता. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी मदत न केल्याने पराभव झाल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता.
तीन वेळा झाले होते आमदार
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 2004, 2009 आणि 2014 मध्ये गोंदिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
BJP | भाजपच्या दोन आमदारांमध्ये वादाची ठिणगी; भाजपची डोकेदुखी वाढणार
“फार अपेक्षेने भाजपत गेलो होतो” – गोपालदास अग्रवाल
“पाच वर्षांपूर्वी मी मोठ्या अपेक्षेने भाजपामध्ये प्रवेश केला होता, पण आमच्याकडील भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा पराभव करण्याचे काम केले. मागील पाच वर्षात भाजपमध्ये माझ्या प्रति विश्वास व सहकार्याची भावना मला फार कमी दिसली.” असे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सांगितले. “माझ्या विरोधात उभ्या राहिलेल्या बंडखोरांना भाजपची पूर्ण साथ मिळत आहे. मला वाटतं की या भागात फक्त लूट सुरू आहे. आमच्या भागातील सिंचन प्रकल्पांना चालना देण्याचे काम झाले नाही.” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम