Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्याला न्यायालयाने फटकारले; ठोठावला 2 लाखांचा दंड!

0
48

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंजारा समाजाच्या महंतांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रसाद व विभूती दिली होती. ठाकरेंनी विभूती आणि प्रसाद स्वीकारला व लगेचच त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीकडे दिला. यामुळे बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यामुळे नांदेड मधील डॉ. मोहन चव्हाण यांनी उद्धव ठाकरें विरोधात नांदेडच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार करत याचिका दाखल केली. परंतु न्यायालयाकडून मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर डॉ. चव्हाणांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. तिथे देखील ही याचिका फेटाळली गेली. त्यामुळे चव्हाण यांनी ॲड. एस. पी. सलगर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.

Uddhav Thackeray | ‘संजय राऊत माझा पाठलाग करायचे’; गंभीर आरोप करत महिलेने ‘उद्धव दादां’कडे मागितला न्याय

यावेळी शासनाकडून सहाय्यक लोकअभियोक्ता प्रीती डिग्गेकर यांनी आपली बाजू मांडल्यानंतर, औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. जी. मेहरे यांनी “ज्याला कायद्याची थोडीफार माहिती आहे ती प्रत्येक व्यक्ती या याचिकेला कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग म्हणेल. हा न्यायव्यवस्थेचा प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला गेलेला वापर आहे.” अशा शब्दात निरीक्षण नोंदवले.

Uddhav Thackeray | ‘कंस मामा भाचीला न्याय कधी देणार?’; उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले

याचिकाकर्त्याचे आरोप बिनबुडाचे

* औरंगाबाद न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपांना कसलाही आधार नाही असे म्हटले आहे.

* उच्च न्यायालयाने डॉ. चव्हाण यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

* दंड ठोठावल्यानंतर चव्हाण यांनी याचिका मागे घेण्यास मान्य केले. तसेच न्यायालयाकडून उद्धव ठाकरे यांना डिमांड ड्राफ्टने दोन लाख रुपये तीन आठवड्यांच्या आत चुकते करावे. असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here