Uddhav Thackeray | ‘संजय राऊत माझा पाठलाग करायचे’; गंभीर आरोप करत महिलेने ‘उद्धव दादां’कडे मागितला न्याय

0
70

Uddhav Thackeray : बदलापूर येथील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. याच घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीने बंद पुकारला. परंतु हायकोर्टाच्या निर्णयानंतर हा बंद मागे घेण्यात आला. पण महाराष्ट्र मध्ये महिलांवर ती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील पक्षांकडून मुकआंदोलन केले गेले. या मुकआंदोलनामध्ये उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या तोंडाला काळा मास्क लावत दादर येथील शिवसेना भवन समोर आंदोलन केले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना महिला सुरक्षिततेच्या आणखी एका प्रकरणाबाबत पत्र लिहिण्यात आले आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी संजय राऊत यांच्यावरती गंभीर आरोप देखील केले आहेत.

Ajit Pawar | ‘अशा आरोपींचं सामानच काढून टाकलं पाहिजे’; बदलापूर प्रकरणावरुन दादांना राग अनावर

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरती पत्राचाळ घोटाळा प्रकरणाचा आरोप आहे. याच प्रकरणी 2022 मध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून स्वप्ना पाटकर यांवर शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला होता. याच प्रकरणास अधोरेखित करत स्त्रियांच्या सुरक्षेबाबत बोलताना संजय राऊत यांनी माझ्याबरोबर जे काही केलं ‘त्याविषयी देखील बोला.’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. स्वप्ना पाटकर या चित्रपट दिग्दर्शिका व मानसोपचार तज्ञ आहेत सोबतच त्यांचे स्वतःचे क्लिनिकही आहे. पाटकरांच्या याच ट्विटला रिट्विट करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना “महाराष्ट्र तुमच्या उत्तराची वाट बघतोय” असं म्हटलं आहे.

Uddhav Thackeray | ‘कंस मामा भाचीला न्याय कधी देणार?’; उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले

नेमकं पत्रात काय म्हणण्यात आलंय

नमस्कार उद्धव दादा

तुम्हाला महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलताना बघून फार आनंद झाला. “स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे परंतु, अशा नराधमांना पाठीशी घालणारे ही शिक्षेसाठी तितकेच पात्र आहेत. प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असेल तर पोलीसही तितकेच विकृत.”असे तुमचे ट्विट वाचले. मी 2016 पासून 2021 पर्यंत तुम्हाला अनेक ईमेल लिहिले. कशाप्रकारे संजय राऊत माझा पाठलाग करत होते, मला धमकावत होते, त्यांच्या व्यतिरिक्त कोणाबरोबरही काम करू देणार नाही असे सांगून घाबरवत होते. याबद्दल संपूर्ण माहिती मी त्या ईमेल्समध्ये लिहिली होती. मला कारण नसताना वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं जायचं, घरातून बाहेर काढण्याची भीती दाखवली जायची, माझे काम देखील बंद करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असून सुद्धा तुम्ही माझी मदत केली नाही याचे मात्र मला फार वाईट वाटते.

‘डॉक्टर रखमाबाई’ हा माझा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही. माझ्याबरोबर अनेक कलाकारांचे तुम्ही नुकसान केले असे मला संजय राऊतांकडून सांगण्यात आले. पण तुम्ही असे काही केले नाही असे मला वाटते. जे काही केले ते संजय राऊत यांनी केले. फोन वरती शिव्याकाळ केली, माझं घर उध्वस्त केलं, एवढेच काय काम बंद करून माझा उदरनिर्वाहाचं साधनही संपवलं. हे सगळं माहिती असतानाही तुम्ही शिवसेना त्यांच्या हातात दिलीत. माझ्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेची ही वाट लावली. आता तुम्ही बहिणींसाठी लढा देताय म्हणून विचारलं, या बहिणींसाठी काय करणार हे सुद्धा महाराष्ट्राला जरूर सांगा. मी वाट पाहतेय. तुमची लाडकी बहीण स्वप्ना पाटकर.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here