Trimbakeshwar | तिसऱ्या श्रावण सोमवारी फेरीला जाताय..?; प्रशासनाने जारी केले नवीन नियम

0
52
Trimbakeshwar
Trimbakeshwar

Trimbakeshwar |  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने शिवभक्त दर्शनासाठी येत असतात. त्यातही तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरीच्या फेरीला विशेष महत्त्व आहे. या फेरीसाठी नाशिकसह संपूर्ण देशभरातून भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर येथे येत असल्याने येथे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शिवभक्तांची प्रचंड गर्दी असते.

दरम्यान, संभाव्य गर्दीचा अंदाज घेत या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजन केले असून, त्यानुसार भाविकांना आता एसटी बस किंवा महापालिकेच्या सिटीलिंक बसनेच प्रवास करावा लागणार आहे. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ट्रॅफिकची समस्या टाळण्यासाठी प्रशासनाने खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य परिवहन आणि नाशिक महानगरपालिका सिटीलींक या दोन्ही विभागांनी जादा बसेसची व्यवस्था केली आहे. तसेच ब्रह्मगिरीच्या फेरीच्या मार्गावरही सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त असून, मार्गावर साध्या वेशातील पोलीस तैनात असणार आहे.

Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी नवीन उपाययोजना; भाविकांसाठी ऑनलाईन पास..?

Trimbakeshwar | कोणत्या मार्गावर किती बस..?

18 ते 20 ऑगस्ट या काळात खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली असून, भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी दर 5 मिनिटांना बस या मार्गावर धावणार आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी राज्य परिवहन मंडळाने 250 जादा बसेसचे नियोजन केलेले आहे. यात नाशिक ते त्र्यंबकेश्वर 180 बस, आंबोली ते त्र्यंबकेश्वर 10 बस, पहिने ते त्र्यंबकेश्वर 10 बसे, घोटी ते त्र्यंबकेश्वर 10 बस, खंबाळे येथून 5 बस सोडल्या जाणार आहे. सिटीलिंक प्रशासनानेही नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर 23 जादा बसेसचे नियोजन केले आहे. नियमित 25 बसेस आणि अधिकच्या 23 अशा एकूण 48 सिटीलिंक बसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सिटीलिंक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण; नेमकं काय घडलं..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here