Trimbakeshwar | नाशिकमधील त्र्यंबकेश्वर देवस्थान हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे कायम दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दर सोमवारी मोठ्या संख्येने दुरदूरहून भाविक त्र्यंबकेश्वर येथे येतात. त्यातच आता आगामी श्रावण महिना असल्याने आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbhamela) पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) देवस्थान ट्रस्ट काही नवीन पाऊले उचलत असल्याचे दिसत आहे.
यानुसार, आता त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी ऑनलाइन पास देण्याचे विचाराधीन आहे. आगामी काळात त्र्यंबकेश्वर देवस्थानात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन ह्या उपाययोजना देवस्थानाकडून केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गर्दीमुळे अनेकवेळा सुरक्षारक्षक आणि भविकांमध्ये वाद होतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच दर्शन रांगेत भाविकाला येथील सुरक्षारक्षकाकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे वाढी निर्माण झाला होता. दरम्यान, याचमुळे आता देवस्थान ट्रस्टकडून उपाययोजा रबवण्यात येणार आहेत.
Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण; नेमकं काय घडलं..?
दिलेल्या मुदतीतच घेत येईल दर्शन
तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर येथेही आता दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन पास देण्याचे नियोजन सुरू आहे. या पासच्या मुदतीतच आता भाविकांना दर्शन घेता येईल, असे सांगण्यात येत आहे. तर, यात भाविकांना मुखदर्शनाचीही सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. (Trimbakeshwar)
Trimbakeshwar | व्हीआयपी दर्शनाचे शुल्क वाढणार
याबरोबरच आता त्र्यंबकेश्वर देवस्थानात आणखी एक बदल होणार असून, त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना व्हीआयपी दर्शनासाठी आता जास्त पैसे मोजावे लागण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, व्हीआयपी दर्शनासाठी देणगीचे शुल्क वाढवण्याबाबत विचार होणार आहे. सध्या व्हीआयपी दर्शनासाठी देणगी २०० रुपये असून, येत्या एक-दोन दिवसात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची बैठक होणार आहे आणि या बैठकीत ऑनलाईन पास आणि सशुल्क दर्शन देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
Trimbakeshwar | ‘दुष्काळाचे सावट दूर होवुदे’; पालकमंत्र्यांचे निवृत्तीनाथांना साकडे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम