Ladki bahin yojana | लाडकी बहीण योजनेबाबत ‘या’ अफवा; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

0
52
Ladki bahin yojana
Ladki bahin yojana

नाशिक :  मध्यप्रदेशच्या धर्तीवर महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladki bahin yojana) सुरू केली. १ जुलैपासून या योजनेची नोंदणी प्रक्रियादेखील सुरू झाली असून, या योजनेच्या नोंदणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी महिलांनी तहसील आणि सेतु कार्यालयांवर गर्दी केली आहे.

तर, दुसरीकडे या योजनेच्या नोंदणीबाबतीत काही गैरप्रकारही समोर आले. काही ठिकाणी तहसील आणि सेतु कार्यालयांत महिलांकडून जास्तीचे पैसे आकारले जात असल्याचे तसेच एजंटचेही अनेक प्रकार उघडकीस आले होते. योजनेची नोंदणी प्रक्रिया आणि कागदपत्रांवरुन अनेक संभ्रम निर्माण झाले असून, अनेक महिला यासाठी नवीन बँक खातेही उघडत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज (Jalaj sharma) शर्मा यांनी सदर योजनेसाठी कुठल्याही बँकेत नव्याने खातं उघडण्याची गरज नसून तुम्ही बँकेत कुठलेही डिपॉझिट भरू नये, असे आवाहन केले आहे.

सुरुवातीला नोंदणी अर्ज भरण्यासाठी केवळ १ जुलै ते १५ जुलै म्हणजे एकूण १५ दिवसांचाच अवधी देण्यात आला होता. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आणि उत्पन्न दाखला इ. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची तहसील आणि सेतु कार्यालयांवर एकच झुंबड उडाली होती. यानंतर नोंदणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली असून, आणखीही काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. (Ladki bahin yojana)

Ladki Bahin Yojna | लाडक्या बहिणींचा त्रास कमी होणार; योजनेचा लाभ घेणे आणखी सोप्पे

‘या’ अफवांवर विश्वास ठेऊन नका 

तर, योजनेबाबत अनेक अफवा पसरल्या असून, यापैकी योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडावे लागणार असल्याचीही एक अफवा पसरली होती. यावर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नवीन बँक खते उघडण्याची तसेच बँक खात्यात कुठलीही रक्कम डिपॉझिट करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

तसेच सर्व बँक, सेतू केंद्रांवर शासकीय अधिकारी नेमण्यासाठी सांगण्यात आले असून, योजनेच्या नोंदणीसाठी कोणीही अतिरिक्त शुल्क किंवा एजंट आढळल्यास कडक कारवाईचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. तर, या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँकेत असलेल्या बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स लागणार आहे.

Ladki Bahin Yojana | ‘१५०० घ्या पण, गद्दार म्हणू नका’; नाशकात पत्रक छापत ‘लाडकी बहीण’ योजनेवर टिका

Ladki bahin yojana | आवश्यक कागदपत्रे 

  1. आधारकार्ड
  2. उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, (नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशनकार्डही चालेल)
  3. बँक पासबुक – झेरॉक्स
  4. पासपोर्ट साईज फोटो

वरील कागदपत्रे आवश्यक असून, या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही ३१ ऑगस्टपर्यंत आहे. योजनेसाठीचा अर्ज हा ऑनलाइन पोर्टल, मोबाइल अँपवर किंवा आपल्या जवळील सेतू केंद्रावर, अंगणवाडी येथे जाऊन भरता येणार आहे. (Ladki Bahin Yojana)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here