Deola | भावडे येथील एसकेडी विद्यालयात अध्यक्ष संजय देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
50
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भावडे येथील एस.के.डी. व व्ही.के.डी. विद्यालयात संस्थेचे चेअरमन संजय देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सचिव मीना देवरे, गंगाबापू मोरे, प्रमोद मेधने, व्ही.के.डी. विद्यालयाचे प्राचार्य एन.के.वाघ एस.के.डी. विद्यालयाचे प्राचार्य एस.एन.पाटील, मंगेश शिंदे, सागर कैलास, बबलू देवरे आदी उपस्थित होते. संस्थेच्या सचिव मीना देवरे यांच्या हस्ते स्काऊट गाईडचे ध्वजारोहण करण्यात आले.

Deola | एस.के.डी. विद्यालयाच्या वतीने शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी

विद्यार्थ्यांनी दिमाखदार संचलन करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमादरम्यान एस.के.डी. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित रोमहर्षक नाटकिय रंगमंचावर सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सादर केलेल्या नाटकीस संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे यांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर करून विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्साह वाढवला.

देवळा | भावडेच्या व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम शाळेत भरले आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन

शिक्षिका भाग्यश्री जाधव, गायत्री बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा जाधव, अजय बच्छाव, कावेरी पवार यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुदस्सर सय्यद, धनंजय परदेशी, राजू देवरे, यज्ञेश आहेर, निलेश भालेराव, सुशांत बागुल, रतन भोईर, कुणाल शिरसाट आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here