हॉटेलचे जेवण पडले साडेसहा लाखांत

0
3

द पॉइंट नाऊ: कुटुंबासमवेत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून सहा लाखांची रोकड सोन्या चांदीचे दागिने, असा ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून घरफोडी केल्याची घटना बुधवारी (दि. २६) रात्री उघडकीस आली आहे. अवघ्या तासाभराच्या कालावधीत चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्या- चांदीचे दागिने लंपास केल्याने व्यापाऱ्याला कुटुंबासमवेत हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणे चांगलेच महागात पडल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरा नजीक गुलमोहर नगर मालती मनोहर अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सौरव जवाहर जैन (३७) यांनी घरफोडीबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या बुधवारी रात्री जैन कुटुंबीय परिसरातील हॉटेलमध्ये गेले होते. तासाभराने ते घरी आले. त्यावेळी दरवाजाला लावलेले लॉक तोडलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर दोन्ही कपाटात ठेवलेले साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवलेली पाच लाख ९१ हजार रुपयांची रोकड,सोन्याच्या चार अंगठ्या ७०० ग्रॅम वजनी चांदीच्या पायातील साखळ्या जागेवर नसल्याने घरफोडी झाल्याचे लक्षात येताच जैन यांनी तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीची माहिती दिली. झालेल्या प्रकरणाची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जैन यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे केवळ लॉक लावलेले होते, तसेच बेडरूममध्ये असलेल्या कपाटाला चाव्या देखील तशाच ठेवलेल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांना आयती संधी उपलब्ध झाली. एवढी रोकड घरात असताना देखील त्याच्या सुरक्षेविषयी निष्काळजीपणा केल्याने त्यातून घरफोडीची घटना घडल्याचे पोलिसांनी अंदाज व्यक्त केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here