Skip to content

मुलासह दवाखान्यात जाणाऱ्या महिलेचा विनयभंग


द पॉइंट नाऊ: दहा महिन्याच्या मुलाची तब्येत बरी नसल्याने त्याला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या महिलेचा मोपेड दुचाकीवरून आलेल्या एका संशयिताने विनयभंग केल्याची घटना भद्रकालीच्या दूध बाजार परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित सुमित विश्वास गुंजाळ (२७, रा. कामटवाडे, नाशिक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या वडिलांसोबत १० महिन्याच्या मुलाला त्याची तब्येत बरी नसल्याने औषधोपचारासाठी भद्रकालीतील दूध बाजार परिसरातील एका डॉक्टरकडे घेऊन जात होती. यावेळी दूध बाजार परिसरातून महिला पायी जात असताना संशयित सुमित

विश्वास गुंजाळ (२७, रा. कामटवाडे, नाशिक) याने मोपेड दुचाकी (एमएच १५, एफडी ८५७४) वरून येऊन फिर्यादी महिलेचा उजवा हात पकडून वाईट नजरेने पाहत महिलेला माझ्यासोबत चल, गाडीवर बस’ असे म्हणत फिर्यादीचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात येत संशयित सुमित विश्वास गुंजाळ याच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. अहिरे करत आहेत.

या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी बद्दल लवकरात लवकर काही कठोर निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!