Skip to content

नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची लाखोंची फसवणूक


द पॉईंट नाऊ: रेल्वेमध्ये टीसी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याने त्यांच्या मुलीच्या मदतीने ५० लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

भावसिंग साळुंखे (रा. एकदंतनगर, अंबड) हा त्याची पत्नी व मुलीसह राहत होता. भावसिंग यांची पत्नी मनीषा हिने स्वप्नील विसपुते यांना आमची मुलगीही सरकारी नोकरीत लागल्याचे सांगून नोकरीला लावून देण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार विसपुते यांनी साळुंखे यांना पाच लाख रुपये दिले. टीसी पदावर नोकरी लावून देण्यासाठी साळुंके यांनी १५ लाख रुपये लागणार असल्याचे सांगितले. भावसिंगने विसपुते यांना बनावट निकाल तयार करून दाखवत पैसे उकळले. विसपुते यांना संशय आल्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. मार्च २०२२ पासून सप्टेंबर २०२२ यादरम्यान विसपुते यांना पैसे दिले नाही. तसेच साळुंखे राहत असलेल्या खोलीतूनही निघून गेल्याने फसवणूक झाल्याचे विसपुते यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शेजाऱ्यांनाही गंडविले

साळुखे दाम्पत्याने स्वप्नील विसपुते यांच्या घराजवळच राहणाऱ्या सोनाली पाटील यांच्याकडूनही १३ लाख ७० हजार, पंकज पवार यांच्याकडून १५ लाख, मनीषा सुरवाडे यांच्याकडून दहा लाख, शिवाजी मगरकर यांच्याकडून ११ लाख असे सुमारे पन्नास लाख रुपये गोळा करून पलायन केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!