नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा

0
23

द पॉईंट नाऊ: वेदांता- फॉक्सकॉननंतर टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. २२ हजार कोटींचा हा प्रकल्प कोणत्या शहरात यावा, यावर नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब समोर आली आहे.याबाबत अंतिम निर्णय वायुसेना व टाटा समूहाला घ्यायचा होता; परंतु नागपूर व नाशिकमध्ये संघर्ष तर गुजरात येथील वडोदरा करिता एकमत होणे या प्रकल्पासाठी निर्णायक घटक ठरल्याचे सांगितले जात आहे.

छगन भुजबळ (माजी मंत्री) व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या चेअरमनला पत्र लिहून क्रमश: नाशकात आणि नागपुरात गुंतवणुकीसाठीची विनंती केली होती. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ३१ ऑक्टोबर २०२१ मध्ये टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांना लिहिलेल्या पत्राची प्रत पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. त्यात त्यांनी प्रकल्पा करिता नाशिकमध्ये सर्वाधिक उपयुक्त स्थान असल्याचे म्हटले होते. येथे एचएएलचा प्रकल्प आहे. सुविधा उपलब्ध आहेत, असेही सांगितले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रकल्प नागपुरात आणण्यास उत्सुक होते. फडणवीस यांनी मागच्या महिन्यातच दिल्लीत चर्चाही केली होती. नागपुर मधील काही उद्योजकांकडून टाटा समूहाशी संपर्क साधण्यात आला होता. नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबरला पत्र लिहून मिहानमध्ये येण्याची विनंती केली. उदय सामंत (उद्योगमंत्री) यांनी एअरबस प्रकल्प मिहानमध्ये येणार असल्याचे जाहीर केले होते.

एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा होता हा प्रकल्प नागपुरात राहिला असता तर युवकांना चांगली संधी होती, विदर्भातील युवक सुजलाम सुफलाम झाला असता. विदर्भात संरक्षण क्षेत्रा संबंधित व्यवसाय विकसित झाले असते.

-प्रदीप माहेश्वरी, उपाध्यक्ष, वेद


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here