नाशिक : नाशिककरांची चिंता वाढवणारी बातमी सध्या समोर येत असून, नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा (Swine Flu) धोका वाढला आहे. नाशिकमध्ये (Nashik News) स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात नाशिक शहरातील 50 वर्षीय पुरूष आणि दिंडोरीमधील (Dindori) एका 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची महिती समोर आली असून आतापर्यंत शहरात 28 स्वाईन फ्लूग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता महापालिका (Nashik NMC) प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
Nashik Crime | नाशिकच्या फर्टीलायझर कंपनीला लाखोंचा गंडा
Swine Flu |शहरातील दोघांचा मृत्यू
मागील आठवड्यात नाशिक शहरातील जेलरोड परिसरात एका 58 वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याला स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तर, दिंडोरीतील एका 42 वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाली होती. या महीलेवरही नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे.
Nashik Zilla Parishad | नाशिक जिल्हा परिषदेचा कारवाईचा धडाका; तिघांचे निलंबन, आठ जणांवर कारवाई
आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू
दरम्यान, नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा धोका निर्माण झाला असून, यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात स्वाईन फ्लूचे जवळपास 23 रुग्ण आढळले होते. तर, एप्रिलमध्ये जेलरोड येथील 59 वर्षीय डॉक्टरचाच स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्यामुळे या आजाराचे गांभीर्य वाढले होते. यानंतर मे महिन्यात सिन्नर येथील दातली गावातील रहिवासी असलेल्या 63 वर्षीय महिला, मालेगावमधील 65 वर्षीय व्यक्ती व 29 वर्षीय महिला, निफाडमधील 68 वर्षीय महिला आणि कोपरगावमधील 65 वर्षीय महिलेचा आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम