Malegaon | महापौरांनंतर आता मालेगावात नगरसेवकावर थरारक हल्ला; हाताची बोटे कापली…

0
36
Malegaon
Malegaon

नाशिक:  गेल्या काही दिवसांपूर्वीच मालेगाव येथे माजी महापौर यांच्यावर प्राणघटक हल्ला झाला होता. माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळ्या झाडल्याची घटना ताजी असतानाच आता मालेगावमध्ये आणखी एक नगरसेवक आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला (Malegaon Corporator Attack) झाल्याची घटना समोर आली आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास मालेगावमधील हजार खोली परिसरातील मदिना चौक येथे ही थरारक घटना घडली. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक अझीझ लल्लू (Aziz Lallu) आणि त्यांच्या मुलावरही जीवघेणा हल्ला केला. तर, या हल्ल्यात अझीझ लल्लू आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Malegaon | नेमकं काय घडलं..?

अधिक माहितीनुसार, मालेगावमधील मदिना चौक येथे अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर दुचाकीवरुन आलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांने वार केले. तर, अझीझ लल्लू यांचे त्यांच्या नातेवाईकांशी जमिनीवरुन वाद सुरू होते. या वादातूनच हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. (Malegaon)

मागील आठवड्यातच मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमरास हल्लेखोरांनी जवळपास तीन गोळ्या झाडल्या यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असतानाच आता मालेगावमधून ही दुसरी घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, लागोपाठ घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, यावरून पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर, मालेगावमध्ये पोलिसांचा वचक आणि भीती उरली नसल्याचेच येथील नागरिकांनी म्हटले आहे.

 Malegaon | मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

हाताची बोटे कापली, थरारक हल्ला 

दरम्यान, माजी नगरसेवक अझीझ लल्लू व त्यांचा मुलगा हे मदिना चौक येथे मशि‍दीतून नमाज पठण करून बाहेर पडले असता, मदिना चौकात या हल्लेखोरांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर धारदार शस्त्रांनी एकापाठोपाठ सपासप वार केले. यात त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, हल्लेखोरांनी त्यांच्या हाताची बोटेदेखील कापली आहेत. तर अझीझ लल्लू यांच्या मुलाच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले असून, या दोघं बापलेकांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Malegaon)

४ जूननंतर सर्वत्र अशीच परिस्थिती दिसेल 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांची भेट घेतली आणि हा हल्ला राजकीय वादातून झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच “४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला की, सर्वत्र अशीच परिस्थिती दिसणार असून, बंदुकीचा धाक दाखवून लोकांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आरोपही यावेळी इम्तियाज जलील यांनी केले. (Malegaon)

Malegaon Blast | मालेगाव स्फोट प्रकरणी हिंदुत्ववादी नेत्यांची नावं घेण्यासाठी दबाव होता ?; आरोपीचा जबाब


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here