Sanjay Raut | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आपल्या परदेश दौऱ्यावरून स्वदेशी परतले आणि येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान धारणेवरून सत्तधारी गटावर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की,”या देशात खरं बोलणाऱ्याच्या विरोधात एकतर गुन्हा दाखल होतो किंवा त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. आता केजरीवाल जेलमध्ये जाताय परत. आम्ही खरं बोललो म्हणून आम्ही जाऊन आलो. आम्ही यांच्या कारवायांना घाबरत नाही.”
निवडणुक आयोगाला हाताशी धरून प्रधानमंत्र्यांसह या सेलिब्रिटी यांनी आपल्या सोयीच्या तारखा निवडणुकीसाठी घेतल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात स्वतःचे मतदान ठेऊन घेतले आहे. निवडणुक आयोग हा जनतेची नाही तर, राजकारणातील सेलिब्रिटींची सोय बघतो.
Sanjay Raut | योग साधनेचा अपमान
ध्यानमग्न माणूस कॅमेरे लाऊन ध्यानाला बसत नाही. 27 कॅमेरे जणू त्यांचे शिष्य आहेत. हा योग साधनेचा अपमान आहे. त्या कुंभकर्णला जागं करू आम्ही 4 जून नंतर. हे मेडीटेशन नाही हा ड्रामा सुरू आहे.
Sanjay Raut | चक्की पिसिंग म्हणणाऱ्यांचंच किसिंग करताय..?; राऊत ‘मोदीराज’वर बरसले
जो भाग बघायचाय तो तुम्ही बघू शकता
तुम्हाला त्या ध्यानस्थ व्यक्तीचा शरीराचा जो भाग बघायचाय तो तुम्ही बघू शकता. 3000 लोक सिक्युरीटीसाठी ठेवलेले आहेत. तिकडे आजूबाजूच्या भागातील सर्व रस्ते, दुकानं बंद आहेत. ही यांची ध्यानधारणा नसून प्रचार आहे आणि निवडणूक आयोग हा सर्व प्रचार बघतोय.
राहुल गांधी संपूर्ण देशाची चॉईस
राहुल गांधी हे संपूर्ण देशाची चॉईस आहेत. त्यांनी ज्याप्रकारे संपूर्ण देशात मेहनत घेतली आहे. ज्याप्रकारे त्यांनी समोरच्यांची धजिया उडवली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाने मान्य केले आहे की, राहुल गांधी देशाचे नेतृत्व करू शकतात.
Sanjay Raut | नाशिक महापालिकेत मोठा गैरव्यवहार..?; थेट मुख्यमंत्र्यांना लाभ..?
कोण तो आमदार टिंगरे फिंगरे झिंगरे
एक अपराधी बिल्डर आणि त्यांच्या परिवाराला वाचवण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. पण मी आभारी आहे आमदार रवींद्र धंगेकर यांचा की त्यांनी हे पूर्ण प्रकरण जनतेसमोर आणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमदार कोण तो टिंगरे फिंगरे झिंगरे हे एका अपराध्याला ज्याने दारू पिऊन दोन खून केले.
धंगेकरांच्या संघर्षाला यश
त्याला वाचवण्यासाठी कशाप्रकारे यंत्रणा कामाला लावली गेली. खोटे पुरावे तयार केले दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. हे सर्व आता लोकांसमोर आलंय. धंगेकर यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणण्यासाठी जो संघर्ष केला. त्याचे हे यश आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम