Shivsena Case | आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत दिरंगाई करत असल्याचे सांगत मागील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले होते. तसेच सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेबाबत नवीन वेळापत्रक लवकरात लवकर सादर करण्याबाबत ही निर्देश दिले होते.आजच्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा खडे बोल लगावले आहेत.
आमदार अपात्रता प्रकरणावर ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्यावतीने एकत्रित याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. याप्रकरणी आजच्या सुनावणीतही सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांवर चंगलेच खडे बोल लगावले आहेत. आम्ही विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबद्दल समाधानी नाही. सॉलिस्टर जनरल यांनी दसऱ्याच्या सुट्टीत विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करून सुधारीत नवीन वेळापत्रक द्यावं, असे निर्देशच सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.तसंच विधानसभा अध्यक्षांनी मीडियासोबत जरा कमी बोलावं, कारण कोर्टही टीव्ही बघत असतं, आम्ही सरकारच्या co-equal branches चा आदर करतो. मात्र, आम्ही सभागृहाच्या पटलावर काय होतं यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही.” असे म्हणत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना टोला लगावला आहे. ह्या सुनावणी दरम्यान सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल परब, अनिल देसाई अशी दिग्गज मंडळीही उपस्थित होती.
आजच्या सुनावणीत, अध्यक्षांची बाजू मांडणारे न्यायाधीश सॉलिसिटर जनरल वेळापत्रकाचा बचाव करण्याच्या भूमिकेत दिसले. परंतु, सुप्रीम कोर्टाने आम्ही वेळापत्रकाबाबत असमाधानी आहोत, असं स्पष्टच सांगितलंय. तसेच, दसऱ्याच्या सुट्टीच्यात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विधानसभा अध्यक्षांसोबत बसून, नवीन वेळापत्रक तयार करुन न्यायालयात सादर करावे, म्हणजे एक निश्चित कार्यपद्धती तयार होईल, असेही सांगितले. पुढील सुनावणीवेळी सुधारित वेळापत्रक जर आले नाही तर, कोर्ट स्वत: वेळापत्रक देईल, असा इशाराच कोर्टाने यावेळी दिल आहे. ( Shivsena Case )
Nashik | येत्या आठ दिवसांत कारवाई दिसली पाहिजे अन्यथा… ; पालकमंत्री भुसे आक्रमक
तुम्हाला निर्णय घेता येत नसेल, तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल : सर्वोच्च न्यायालय
अध्यक्षांची बाजू मांडताना तुषार मेहता यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ३४ याचिका दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच, आमच्याकडे अर्ज येत आहेत, प्रक्रिया सुरू आहे. तुषार मेहतांचं बोलून झाल्यावर सरन्यायाधीशांनी उत्तर दिले की, मागील सुनावणीत तुम्हाला सांगण्यात आलं होतं की, तुम्ही जर निर्णय घेत नसाल, तर निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, तुम्ही जर वेळापत्रक देत नसाल तसंच याबाबतची याचिका निकाली काढत नसाल, तर आमचा नाईलाज होईल आणि आम्हाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल, असं म्हणत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुन्हा विधानसभा अध्यक्षांना गेल्या सुनावणीतील निर्देशांची आठवण करून दिली.
दसऱ्याच्या सुट्टीत नवीन सुधारित वेळापत्रक तयार करा. आणि ३० तारखेला परत आमच्याकडे या. ते वेळापत्रक जर आम्हाला मान्य असेल तर ठीक, नाहीतर आम्ही वेळापत्रक देऊ, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची बाजू सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंडली तर,तसेच ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. ( Shivsena Case )
Nashik | कांदा, टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले; भांडवल नसल्याने द्राक्षछाटणीवर परिणाम
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम