Skip to content

चिंचावड-निंबोळा रस्त्यावर बुलेट व कार अपघातात एकाचा मृत्यू


देवळा : मालेगावहुन कळवणच्या दिशेने जात असलेल्या माध्यमिक शिक्षकाचा चिंचावड-निंबोळा रस्त्यावर बुलेट व कार अपघातात मृत्यू झाला. राजेंद्र तोताराम  सूर्यवंशी (वय ४२) रा. नवलाने ता.जि. धुळे असे या मृत शिक्षकाचे नाव असून ते बोरगाव ता.सुरगाणा येथील धैर्यशीलराव पवार माध्यमिक विद्यालयात कलाशिक्षक होते.

       शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखपदी खर्डे येथील विजय जगताप

 देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  सोमवार (दि .१६) रोजी सायंकाळी चिंचावड-निंबोळा रस्त्यावर शिव नाल्याजवळ निंबोळा शिवारात मालेगावहुन कळवणच्या दिशेने जाणाऱ्या बुलेट ला ( एमएच १५ एचके ७४५६ )ला मागून येणाऱ्या इको कार (एमएच ०५ डीएच ३०६६) ने जोरदार धडक दिली व तेथून सदर कारचालक फरार झाला. या अपघातात बुलेटस्वाराच्या छातीस व तोंडाला जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

     Shivsena Case | सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना पुन्हा झापलं..

सदर घटनेबाबत चिंचावड ता.मालेगाव येथील पोलीसपाटील संदीप खैरनार यांनी देवळा पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान या अपघाताबाबत देवळा पोलिसांत अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ,पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे .गवळी करत आहेत. अपघातात मृत झालेले शिक्षक हे सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते.  ते आपल्या धुळे जिल्ह्यातील मुळ गाव नवलाने येथून कळवण येथे जात असल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे. त्यांचे कुटुंब कळवण येथे स्थित असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!