Skip to content

Nashik | येत्या आठ दिवसांत कारवाई दिसली पाहिजे अन्यथा… ; पालकमंत्री भुसे आक्रमक


Nashik | आज नाशिक शहरात ‘अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ’ बाबत आढावा बैठक झालेली आहे. यावेळी शहरातील अवैध धंदे चालकांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत. नाशकात तरुणाईमध्ये ड्रग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून तरुणाई आहारी गेल्याचे या चर्चेतून निदर्शनास आले. यामुळे फक्त कारवाईवर न थांबता जनजागृती करणे देखील महत्वाचे असल्याने आज “अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ” संदर्भात बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

Nashik | कांदा, टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले; भांडवल नसल्याने द्राक्षछाटणीवर परिणाम

येणाऱ्या आठ दिवसाच्या आत रस्त्यावर उतरून कारवाईच्या माध्यमातून काम दिसले पाहिजे अशा सूचना यावेळी यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत. लोकप्रतिधींनी सूचना करून देखील पोलिस कारवाई करत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे. याबत खोलवर जाऊन पाळेमुळे खोदून काढण्याच्या सूचना केल्या आहेत. जर कारवाई दिसली नाही तर वरिष्ठ स्थरावर हा विषय टाकला जाईल. कोणत्याही पक्षाचा असो किंवा जाती-धर्माचा असो त्याच्यावर कारवाई अपेक्षित आहे. कारवाई दिसली नाही किंवा ज्या विभागात अवैध धंदे दिसून आले तर त्या विभागातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल असे निर्देश यावेळी यावेळी पालकमंत्री दादजी भुसे यांनी दिलेले आहेत. या बैठकीत आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. सरोज अहिरे, आ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त , नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग अधिकारी, अन्न व प्रशासन विभाग अधिकारी, प्रमुख शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज अ‍ॅज ए नेशन बिल्डर; महाराजांवर पदव्युत्तर पदवी घेता येणार

टास्क फोर्स निर्माण करून कारवाई करावी, तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे, मी स्वतः जरी कुणाला वाचविण्यासाठी कॉल केला असेल तर माझी देखील चौकशी करा, ज्या लोकप्रतनिधींचे कॉल कुणाला वाचवायला जात असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करा. बेकायदेशीर जे असेल त्याच्यावर हातोडा चालविण्याच्या देखील सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. मी या आधीच अवैध धंदे चालकांची गय करू नका अशी भूमिका घेतलेली आहे. ड्रग्स बाबत काही दिवसांपूर्वी माहिती मागवली होती, त्यानुसार शहरात पोलिस कारवाई करण्यात आली. येणाऱ्या काळात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून समूळ उच्चाटन केले जाईल. नाशकात अवैध धंदा चालकांना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. येत्या काही दिवसात विशेष पथकांच्या माध्यमातून देखील इतर अवैध धंद्यांवर देखील टाच आणली जाईल. अशी ग्वाही देखील पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेली आहे.

एका बाजूला पोलिस प्रशासन कारवाई करेलच मात्र त्याचवेळी समाजात विघातक परिणामांची जनजागृती होणे गरजेचे आहे. जी तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे त्यांचे समाज परीवर्तन होणे गरजेचे आहे. याला अनुसरून काय उपाययोजना आखणे गरजेचे आहे याचा उहापोह या बैठकीत झाला आहे. यावेळी नागरिकांनी देखील आपल्या काही सूचना असल्यास लेखी स्वरूपात पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयात कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल, सामान्य नागरिक याठिकाणी तक्रार करू शकतात 6262256363 तर 8263998062 या whattsup क्रमांकावर नागरिक माहिती पाठवू शकता. तक्रार दाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!