Skip to content

युवकाची गळफास लावून आत्महत्या; बिडी कामगारनगर येथील घटना


नाशिक : पंचवटीतील एका २९ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

अमृतधाम परिसरातील बिडी कामगारनगर वसाहतीत ही घटना घडली असून शशिकांत राजेंद्र मोरे (रा. आंबेडकर चौक) असे मृत युवकाचे नाव आहे. यावेळी मोरे याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोरे याने मंगळवार दि. २० रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता, त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत राजेंद्र जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार लोहकरे करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!