Skip to content

सातपूरमध्ये तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने एका वृध्देचा दुर्दैवी मृत्यू


नाशिक : शहरातील सातपूर परिसरात एका वृद्धेचा बाल्कनीतून तोल पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगला दत्तात्रय दळवी (७२, रा. खांदवेनगर) असे या मृत वृद्धेचे नाव आहे.

सविस्तर घटना अशी आहे, एबीबी कंपनीच्या मागे खांदवेनगर येथे मंगला दळवी या स्वागत सिंपनी बिल्डींगमध्ये आशा फडणवीस यांच्यासोबत राहत होत्या. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दळवी ह्या बाल्कनीत गेल्यानंतर तिथून त्यांचा तोल गेल्याने त्या जमिनीवर कोसळल्या होत्या. घटनेत त्यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, ही दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

याबाबत भाचा चिन्मय दळवी यांनी सदर माहिती दिल्याने त्यांच्या मृत्यूची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करत आहेत. यावेळी पोलिसांनी लहान मुल, वयोवृद्ध लोकांची काळजी घेणे गरजेचे असल्याचा आवाहन केले आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकांनी इमारती उभारताना सुरक्षित गॅलरी कराव्यात, असे आवाहनही यावेळी केले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!