‘सिव्हिल’मधील बनावट प्रमाणपत्र देणारे रॅकेट आता गोत्यात

0
2

द पॉईंट नाऊ: पोलिस अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी खोटे वैद्यकीय अहवाल सादर केल्याचा प्रकरणात ‘सिव्हिल हॉस्पिटल’ मधील रॅकेट आता गोत्यात येत आहे. लिफ्टमन न्यायालयीन कोठडीत असून, दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक मंगळवारी न्यायालयाने फेटाळला आहे.

डॉ. निखील सैंदाणे आणि डॉ. किशोर श्रीवास यांना अटक होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण उघड झाल्यापासून दोघे कोणाच्याही संपर्कात नसल्याने हे दोघे संशयाच्या घेऱ्यात असल्याचे कळते. त्यांना ताब्यात घेतल्यावर बनावट प्रमाणपत्र प्रकरणातील अनेक मुद्दयांची शहानिशा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रामीण पोलिस दलातील आंतरजिल्हा बदल्यांसाठी काही पोलिसांनी नातेवाइकांच्या गंभीर आजारांसह शस्त्रक्रियेचे अहवाल सादर केले. ती प्रमाणपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या निदर्शनास आले. सिव्हिल प्रशासनाला याबाबत विचारणा केल्यावर बनावट अहवालांचे पितळ उघड पडले.

याप्रकरणात अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज आणि सिव्हिलचा लिफ्टमन कांतिलाल गांगुर्डे यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही न्यायालयीन कोठडीत असून या दरम्यान, तात्कालीन अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर श्रीवास आणि प्रशासकीय अधिकारी डॉक्टर निखिल सैंदाणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यास न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे त्यांच्यावरील संशय अजूनच दाट झाला आहे. तर मंगळवारी दुपारी न्यायालयात दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान पोलिसांनी तपासातील मुद्द्यांची माहिती देत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. याचबरोबर दोन्ही डॉक्टरांना यापूर्वीही जबाबासाठी बोलावूनही त्यांनी टाळल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भातील दोघेही संशयित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पोलिस घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. या सर्व प्रकरणामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली असून खाजगी रुग्णालयातील काही डॉक्टरांपर्यंत प्रकरणाचे धागेदोरे जाण्याची शक्यता वर्तवली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here