दिल्ली : नुकताच मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे व भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ह्या विराट मेळाव्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही थेट दिल्लीतून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
आज मुख्यमंत्री शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी सर्व राज्यप्रमुखांची भेट घेतली, यावेळी महाराष्ट्र सदनात त्यांचा सत्कार झाला व त्यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर झालेल्या भाषणात शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या गटप्रमुख मेळाव्यावर जहरी टीका करताना अडीच वर्षानंतर गटप्रमुखांची आठवण आली का ? असा खोचक प्रश्न विचारत शिंदे यांनी ठाकरेंवर टीका सोडली आहे. तसेच आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जवळपास सर्वच टीकांना सडेतोड उत्तरही दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे :
– शिंदेनी भाषणाची सुरुवात करताना म्हटले, अडीच महिन्यांपूर्वी सगळ्यांनी आम्हाला सांगितले, की राज्यात परिवर्तनाची गरज आहे.
– आम्ही बाळासाहेबांच्या विचारधारांना मानणारा, तसेच आनंद दिघेंनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने पुढे जाणारा कार्यकर्ता आहोत.
– यावेळी उद्धव यांच्यावर निशाना साधत म्हणाले, आमच्या संघर्षाची महाराष्ट्राने दखल न घेता उभ्य देशाने व जगातील ३३ देशांनी आमचा उठाव पहिला.
– दुर्दैवाने मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या लालसेपोटी भाजपला दूर सारून कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली, आणि मविआ सरकार स्थापित झाली. अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
– शिंदेनी बाळासाहेबांची आठवण काढताना म्हटले, आम्हाला साहेबांनी सांगितले होते की कॉंग्रेस-राष्ट्रवादी आपले शत्रू आहे.
– आज आम्ही जिथे जातो, तिथे अनेक जण म्हणतात, शिंदे साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत. असा दावा त्यांनी केला.
– आम्हाला अभिमान आहे, आम्ही त्यांचे विचार पुढे नेत आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का ?, असा प्रश्न उद्धवना विचारला.
– आजच्या मेळाव्यात शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यावर बोलताना म्हटले, शिवसैनिकांवर विश्वास नाही. म्हणून अशाप्रकारे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेत आहे.
– ठाकरेंनी कंत्राटी मुख्यमंत्री संबोधल्याबद्दल बोलताना शिंदेनी मी समाजाचा विकास करण्याचे कंत्राट घेतले आहे, असे उत्तर दिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम