Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; दिंडोरीत झिरवाळांना ‘हा’ नेता टक्कर देणार

0
107
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar NCP | महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता या पक्षाची दुसरी यादी आज शनिवार दि. 26 ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली असून या यादीमध्ये 22 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

Sharad Pawar NCP | थोरल्या पवारांनी भाजपची विकेट पाडली; माजी राज्यमंत्री शरद पवारांच्या गळाला

काँग्रेसने दावा केलेली जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला

या यादीत बीडमधून संदीप क्षीरसागर, खडकवासला येथून सचिन घोडके, येवल्यातून माणिकराव काळे, जुन्नर मधून सत्यशील शेरकर, माळशिरस मधून उत्तम जानकर, पर्वती मधून अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पर्वती मतदारसंघातून काँग्रेसच्या आबा बागुल यांनी दावा सांगितला होता. परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपल्याकडेच ठेवली आहे.

NCP Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी यादी पुढीलप्रमाणे:

* सतीश अण्णा पाटील – एरंडोल

* सतीश चव्हाण – गंगापूर

* पांडुरंग बरोरा – शहापूर

* राहुल मोटे – परांडा

* संदीप क्षीरसागर – बीड

* मयुरा काळे – आर्वी

* दीपिका चव्हाण – बागलाण

* माणिकराव शिंदे – येवला

* उदय सांगळे – सिन्नर

* सुनिता चारोस्कर – दिंडोरी

* गणेश गीते – नाशिक पूर्व

* ओमी कलानी – उल्हासनगर

* सत्यशील शेरकर – जुन्नर

* सुलक्षणा शीलवंत – पिंपरी

* सचिन दोडके – खडकवासला

* अश्विनी कदम – पर्वती

* अमित भांगरे – अकोले

* अभिषेक ककळमकर -अहिल्या नगर शहर

* उत्तमराव जानकर – माळशिरस

* दीपक चव्हाण – फलटण

* नंदिनी भाबुळकर कुपेकर – चंदगड

* मदन कारंडे – इचलकरंजी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here