Shantata Rally | जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात; समता परिषदेचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

0
38
Shantata Rally
Shantata Rally

Shantata Rally | नाशिक :  आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता जनजागृती रॅलीचे(Shantata Rally) आज नाशिकमध्ये आगमन होत आहे. नाशिकमध्ये आज मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)यांच्या नेतृत्वाखाली शांतता जनजागृती रॅली हि पार पडत आहे. नुकतंच मनोज जरांगे यांचं नाशिकमध्ये आगमन झालं असून, रॅलीला सुरुवात झाली आहे. या रॅलीसाठी नाशिकमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या रॅलीत सहभागी झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर, मनोज जरांगे नाशिकमध्ये (Nashik) दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, भुजबळांच्या समता परिषदेच्या (Samta Parishad) पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सिन्नरमधील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

Shantata Rally | समता परिषदेचे दोघं स्थानबद्ध 

नाशिकमधील शंतता जनजागृती रॅलीच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने हा खबरदारीचा उपाय म्हणून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. समता परिषदेचे सिन्नर तालुक्याचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, शहराध्यक्ष विशाल चव्हाण या दोघांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले असून, सिन्नर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे. तर, या घटनेचा समता परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here