Shantata Rally | तुमच्या जिल्ह्याची साडेसाती, त्याचा सुपडा साफ करतो; नाशकातून जरांगेंचे भुजबळांना आव्हान

0
56
Shantata Rally
Shantata Rally

Shantata Rally | आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात नाशिक येथे शांतता जनजागृती रॅली (Shantata Rally) पार पडली. तसेच नाशिकमध्ये जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोपही आजच्या या सभेने झाला. तपोवनपासून निघालेली ही सभा सीबीएस चौकात पोहोचली आणि येथे जरांगे यांनी रॅलीत सहभागी मराठा समाज बांधवांना संबोधित केले. यावेळी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal), प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर सडकून टिका केली आणि २९ तारखेला मराठा समाजाने मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीला येण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

जातवान, कट्टरता, कडवट मराठे म्हणजे काय असतात हे आज नाशिक जिल्ह्यातील मराठ्यांनी दाखवून दिले. तुम्ही आज माझी कॉलर टाईट केली. तुम्ही आज सिद्ध केलं की आता नेते आणि पक्ष नाहीतर आता आमची लेकरं आम्हाला मोठी करायचीय, या शब्दांत जमलेल्या अफाट जनसमुदायाचे मनोज जरांगे यांनी कौतुक केले.

Shantata Rally | जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात; समता परिषदेचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

Shantata Rally | तुमच्या जिल्ह्याची साडेसाती, ते दलिंदर…  

दरम्यान, यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टिका केली आणि भुजबळांना थेट आव्हानही जरांगेंनी दिले आहे. “तुमच्या जिल्ह्याला लागेलेली साडेसाती. ते सगळ्या दुनियाचं दलिंदर. ते मला म्हणतं तु ८ जागा तरी निवडून आणून दाखव… अरे तु माझ्या काय नादी लागतो. तु एकदा माझ्या नादी लागला तुला नाशिकसुद्धा सोडला नाही प्रचाराला.

अन् त्या भुजबळचं ऐकून ते फडणवीस पण काय येडयावाणी करतंय काय माहीत. यावेळेस तुमच्या येवल्याचं नाव पवित्र होणार. तुम्ही काळजी करू नका. त्याचा यंदा कार्यक्रमच लावतो मी. त्याच्याबद्दल बोलायला आणि त्याला उगीच किंमत द्यायला नको. त्याला किंमत दिली का ते लय येडयावाणी करतं. आता ते येवल्यातले लोकं पण मला येऊन सांगता की, तुम्ही म्हटले त्याला निवडून द्या. तरी आम्ही त्याला निवडून देत नसतो.

Shantata Rally | जरांगेंच्या शांतता रॅलीची ‘धास्ती’..?; भुजबळ फार्म बाहेर मोठा फौजफाटा तैनात

सगळ्यांचेच टांगे पलटी करायचे; मराठ्यांनी बदला घ्यायला शिका

२९ तारखेला राज्यातील सर्व मराठ्यांनी अंतरवालीला या. यांना पडायचं की निवडून आणायचं हे आपण सर्व एकजुटीने ठरवू. आपल्या जीवावर हे मोठे झाले. वेळ आली की मराठ्यांनी बदला घ्यायलाही शिका. आता २०२४ ला सगळ्यांचेच टांगे पलटी करायचे. २९ तारखेपर्यंत देता का आरक्षण देता का पाहू. नाहीतर कोणाला पडायचं अन् कोणाला आणायचं ते ठरवू.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here