Ladki Bahin Yojana : मुंबई | राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) घोषणा केल्यापासून राज्यात सगळीकडे याच योजनेची चर्चा (Maharashtra News) सुरू आहे. सत्ताधारी, विरोधकांमध्ये या योजनेवरून चांगलीच जुंपल्याचेही पहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून योजनेवर टिका केली जात आहे. तर, दुसरीकडे महायुतीत (Mahayuti) योजनेच्या श्रेयवादासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे. (Ladki Bahin Yojana)
अजित पवारांकडून जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने लाडकी बहिण योजनेचे प्रमोशन आणि श्रेय घ्यायचे काम सुरू असून, यातच आता भाजपनेदेखील विशेष अभियान सुरू केलं आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहे. तर, या बाबतची माहिती ही स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विट करत दिली आहे.
Ladki Bahin Yojana | ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ राखी पौर्णिमेला येणार
दरम्यान, या ट्विटमध्ये “महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात महायुती सरकार व विशेषतः भारतीय जनता पार्टी हे अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना सशक्त करण्याचे काम पक्ष तसेच सरकारद्वारे आम्ही करत आहोत. तर, येत्या 18 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” या विशेष उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
तसेच राज्यातील सर्व माता – भगिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले असून, भाजप कार्यकर्त्यांना आणि भाजप महिला मोर्चाला या उपक्रमाची जबाबदारी घेत जास्तीत जास्त महिलांना उपक्रमात सहभागी करून घेण्याची विनंतीही बावनकुळे यांनी केली आहे. (Ladki Bahin Yojana)
Ladki Bahin Yojana | लाडकी बहीणच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारची ‘लाडकी मोलकरीण’ योजना..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम