Skip to content

देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान


देहूमधून आज संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj palkhi sohala) यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पालखी सोहळ्याला सुरुवात होणार असून पहिला मुक्काम इनामदार वाडा येथे होणार आहे.

गेले दोन वर्ष कोरोनाच्या काळात पालखी स्थगित करण्यात आली होती. परंतु यंदाच्या वर्षी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे पालखी सोहळा दिमाखात (Sant Tukaram Maharaj palkhi sohala) साजरा करण्यात येणार आहे.

देहूमधून संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी (Sant Tukaram Maharaj palkhi sohala) होण्यासाठी लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत देहू आळंदीत दाखल झाले आहेत.

या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून स्वच्छ पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग आणि स्वच्छता विभाग सेवा देणार असून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आल्याचं मुख्यअधिकाऱ्यांनी (Sant Tukaram Maharaj palkhi sohala) सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा : 

शेतकऱ्यांना बांधावर मिळणार आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पीएमपीएमएलच्या वतीने वारकऱ्यांसाठी ज्यादा बस सोडण्यात येत आहेत. काल पहिला टप्पा होता. या माध्यमातून ज्यादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर आजदेखील दुसऱ्या टप्प्यात आणखी जास्त गाड्या सोडण्यात येत आहेत. वारकऱ्यांनीदेखील (Sant Tukaram Maharaj palkhi sohala) बसने सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन पीएमपीएमएलच्या वतीने करण्यात आले आहे.

अतिवृष्टीचा इशारा जारी, जाणून घ्या – या आठवड्यातील हवामानाचे प्रत्येक अपडेट


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!