Skip to content

खडसेंचा पराभवासाठी महाजनांचे देव पाण्यात तर ; महाजंनाचे मनसुभे उधळण्यासाठी अजितदादा मैदानात


मुंबई : निवडणुक रंगतदार होत असून विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान आता अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यसभेप्रमाणेच ही निवडणूक अत्यंत चुरशीची सुरू आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या समन्वयाची परिक्षा तर आहेच मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा देखील कस लागणार आहे. फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होती. खडसेंचा पराभव भाजपाला फारच महत्त्वाचा आहे, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व सूत्रे हाती घेत दादांनी भाजपचे मनसुबे उधळून लावले आहेत अजितदादांच्या रणनीतीमुळे खडसे यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जातेय तरी फडणवीस शेवटच्या क्षणी काय खेळी करता यावर सर्व अवलंबून आहे.

हे ही वाचा:वि.परिषद निवडणूक राज्यसभा निवडणुकीसारखी रंजक ; धक्कादायक निकाल येण्याची शक्यता बळावली https://thepointnow.in/mlc-election-maharastra-2/

गेल्या आठ दिवसापूर्वी राज्यसभा निवडणुकीत फडणवीस यांनी महविकास आघाडीला पराभवाची धूळ चारत आपल्या स्ट्रॅटेजीमुळे भाजपचे तीन उमेदवार निवडून आनले. यामुळे भाजपाचा आत्मविश्वास पुन्हा वाढला आहे. फडणवीसांनी केलेला हा चमत्कार विधान परिषदेच्या निवडणुकीतही दिसेल, असा दावा भाजपच्या सर्वच नेत्यांकडून केला जात असला तरी ते तूर्तास तरी शक्य वाटत नाहीये. भाजपाने आपले पाचही उमेदवार निवडून आणताना भाजपकडून खडसे यांना लक्ष्य केल्याची चर्चा होती. त्यांच्या पराभवासाठी भाजपचे नेत्यांची खलबतं सुरू असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यापासून फडणवीसांना लक्ष्य करत आहेत. त्यातल्या त्यात जळगांव जिल्हयात महाजन खडसे संघर्ष जोमात सुरू आहे.

खडसेंचा पराभव करण्यासाठी भाजपा सज्ज असताना याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरेपुर दक्षता घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार अजित पवार यांना भेटल्यानंतरच मतदानाला जात होते. मतदानाची सर्व सूत्र दादांनी हातात घेतली. यामुळें खडसेंचा जिवंत जीव आला आहे. पहिल्या पसंतीचे मत कुणी कुणाला द्यायचे, हे ठरलं होतं. त्यानुसार खडसेंची जागा सुरक्षित करण्यासाठी पक्षाचे सर्व मंत्री आणि विश्वासू सहकारी व विश्वासू अपक्ष आमदारांना खडसे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्यास अजिदादांनी सांगितल्याचे समजते. अजिदादा स्वत: प्रत्येक आमदाराला समजावून सागंत होते. यामुळे नाथा भाऊंचे पुन्हा कमबॅक शक्य वाटत आहे.

भाजपा पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत असताना अजितदादांनी सर्व गणितं बसवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दुसरे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनाही अपेक्षित मतदान व्हावे, यादृष्टीने काळजी घेतली आहे. इतर आमदार व मित्रपक्षांची सर्व मतं रामराजेंना मिळावीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा पहिल्या पसंतीच्या मतदानाचा कोटा पूर्ण होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे. यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.

गिरीश महाजन यांचे स्वप्नांना ब्रेक लागण्याची चिन्हे असून नाथा पुन्हा आता असे म्हणण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीने आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा 28 केल्याची चर्चा आहे. विजयासाठी 26 मतांची गरज असून दोघांचा दोन-दोन मतांचा कोटा वाढवण्यात आला आहे. कारण एक-दोन मतं बाद झाली तरी त्यांना धोका होऊ नये, म्हणून ही दक्षता घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीकडे 51 मतं असली तरी मित्रपक्ष व अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीने पाच अधिकची मतं मिळवल्याचीही चर्चा आहे. काही तासातच सर्व चित्र क्लिअर होणार असून नेमक काय होते हे बघणे महत्वाचे आहे..


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!