मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज गुप्त मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीच्या निकालाची सर्वत्र उत्सुकता लागून राहिली आहे. भाजप व काँग्रेस मध्ये अटीतटीचा (BJP v/s Congress) सामना सुरू असून, या निवडणुकीसाठी प्रत्येक आमदाराचे मत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
काँग्रेसचे भाई जगताप विरुद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्यात ही लढत असणार आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मतं काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा (BJP v/s Congress) प्रयत्न आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
हे सुद्धा वाचा :
वि.परिषद निवडणूक राज्यसभा निवडणुकीसारखी रंजक ; धक्कादायक निकाल येण्याची शक्यता बळावली
तर दुसरीकडे प्रसाद लाड यांच्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी प्राण पणाला लावून युक्ती लढवत आहेत. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जाते. राज्यसभेत राजकीय पक्षांची मते फुटली नव्हती. पण, विधान परिषदेत काहीही (BJP v/s Congress) होऊ शकते, हे सर्व पक्षांचे नेते सूचित करीत आहेत.
‘अग्नीपथ’ योजनेसंदर्भात उद्योगपती महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम