Skip to content

एकनाथ खडसे बाजी मारणार का ?


जळगाव : विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) कडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देऊन भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने (bjp) आपले लक्ष्य ठरवून खडसे यांना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजपकडे असलेली सत्तास्थाने हातातून गेल्या. त्यात राष्ट्रवादीने खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी देत महाजनांची चांगली कोंडी केल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे खडसे यांना कुठल्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी महाजनांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

भाजपकडून राजकीय खेळी

खडसे राष्ट्रवादीत गेल्यावर त्यांचे राजकीय पुनर्वसन होईल अशी आशा होती. त्यानुसार राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या यादीत त्यांचा नावाचा समावेष केला. मात्र आद्यपही ती यादी प्रलंबित असून भाजप खेळीनेच खडसे यांच्या मार्गात राजकीय काटे पेरले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधान परिषद निवणुकित खडसे यांचा विजय झाल्यास सर्वाधीक धक्का महाजन या यांना बसणार आहे.

तर राजकीय समीकरण बदलणार

राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने नवीन राजकीय उमेद मिळाली असून त्यांचा विजय झाल्यास तब्बल सहा वर्षांनंतर ते गुलाल उधळणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वाचेलक्ष लागून आहे. त्यामुळे खडसे विजयी झाल्यास खानदेशचे राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!