Ravindra Waikar | ईडी चौकशी सुरू झाली अन् ठाकरेंचा शिलेदार शिंदे गटात आला

0
30
Ravindra Waikar
Ravindra Waikar

Ravindra Waikar | आगामी निवडणुकांच्या पर्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांतील नेते हे सत्ताधारी गोटात दाखल होत आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या आणखी एका अत्यंत विश्वासू शिलेदाराने त्यांची साथ सोडली असून, ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. पण नेमका हा पक्षप्रवेश निवडणुकांसाठी झाला की ईडी चौकशीच्या धाकाने याबाबत स्वतः शिंदे गटात नव्याने दाखल झालेले ठाकरेंचे आमदार रवींद्र वायकर यांनी खुलासा केला आहे. (Ravindra Waikar)

दरम्यान, आमदार रवींद्र वायकर यांची इडि चौकशी सुरू असून, त्यांच्यावर जोगेश्वरी येथील कथित आर्थिक घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांच्या निवासस्थानी आणि कामाच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वीच ईडीने धाडही टाकली होती. मात्र, या प्रकरणी अलीकडेच सुनावणीवेळी मुंबई महानगरपालिकेने वायकर यांच्या विरोधातील आरोप मागे घेतले होते.

Rajan Vichare | दादा भूसेंच्या व्याहींनवरही ईडीची धाड

ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी आज शिवसेना शिंदे गटात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून वायकर हे ईडी कारवाईचा वाढता दबाव पाहता सत्ताधारी गोटात येणार याची चर्चा होती. तर, यामुळे नाईलाजाने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.(Ravindra Waikar)

Ravindra Waikar | आमदाराने सांगितलं खरं कारण 

हा पक्ष प्रवेशाचा सोहळा मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडला. यावेळी रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचे खरे कारण स्पष्टपणे सांगितले असून, त्यांच्या एकूण बोलण्याचा सूर लक्षात घेता त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू किंवा त्यांचे मनपरिवर्तन झाल्यामुळे नाहीतर स्वत:च्या मतदारसंघातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी किंवा निधीअभावी शिंदे गटात प्रवेश केल्याचे यावेळी स्पष्ट झाले.(Ravindra Waikar)

Uddhav Thackrey | उद्धव ठाकरेंच्या मोठ्या नेत्याच्या घरी एसीबीची धाड

लगेच मुख्यमंत्र्यांच्या हातात कागदपत्रांचा गठ्ठा दिला

ठाकरे गटात असताना रवींद्र वायकर यांनी विद्यमान महायुती सरकारकडून विकासकामांच्या निधीवाटपात भेदभाव होत असलेल्याची तक्रार केली होती. याबाबत रवींद्र वायकर यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, “या प्रकरणी न्यायालयाने माझी मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर मी सभागृहात संसदीय आयुधे वापरुन हा प्रश्न मांडला होता. कारण सत्तेत असलेल्यांना जास्त निधी दिला जातो, असेही ते यावेळी म्हटले.

तर, नव्याने दाखल झालेल्या सहकाऱ्याची बाजू सावरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिश्कील टिप्पणी केली. ते म्हणाले की,”वायकर जास्त निधी मिळवण्यासाठीच सत्तेत आलेत.” दरम्यान, यानंतर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रवींद्र वायकर यांनी लगेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातात त्यांच्या मागण्यांच्या कागदपत्रांचा गठ्ठा दिला. तर यावर मुख्यमंत्र्यांनी वायकर यांना सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.(Ravindra Waikar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here