Uddhav Thackrey | उद्धव ठाकरेंच्या मोठ्या नेत्याच्या घरी एसीबीची धाड

0
1
Uddhav Thackrey
Uddhav Thackrey

Uddhav Thackrey |  गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांवर एका पाठोपाठ एक ईडीच्या धाड पडत आहेत. आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीच्या आधीच आमदार रवींद्र वायकर आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या घारी ईडीची धाड पडली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या आणखी एका आमदाराच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली आहे. (Uddhav Thackrey)

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवी यांच्या घारी ही धाड पडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही धाड टाकली असून, आज सकाळपासूनच राजन साळवींची चौकशी सुरू झाली आहे. त्यांच्या घरी आणि रत्नागिरी आणि रायगड येथील हॉटेलवर एसीबीकडून ही चौकशी सुरू आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही आता चौकशी सुरु करण्यात आली आहे.(Uddhav Thackrey)

Uddhav Thackrey | …अन् ठाकरेंच्या परिषदेत लावला ‘तो’ व्हिडिओ

Uddhav Thackrey | आधी बांधकाम विभागाचे अधिकारी…

आज सकाळच्या सुमारास आमदार राजन साळवी यांच्या जुन्या आणि सध्या वास्तव्यास असलेल्या निवासस्थानी आणि हॉटेलमध्ये एसीबीचे अधिकारी हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास पोहचले. एसीबीच्या तब्बल १८ ते २० अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरू आहे. हे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून आले आणि त्यानंतर ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. एका वृत्तानुसार, यापूर्वीही साळवींच्या घरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले होते. त्यांनी घराचे मोजमाप केले आणि आता एसीबीचे अधिकारी आले आहेत.(Uddhav Thackrey)

Uddhav Thackrey | लवादाला मोतीबिंदू झाला म्हणून पुरावे दिसले नाही; पत्रकार परिषदेत राऊत गरजले

असे आहेत आरोप..?

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिकची अपसंपदा जमा केल्याचे आरोप आहेत. याच प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. आमदार राजन साळवी यांची मूळ संपत्ती ही अंदाजे २ कोटी ९२ लाख रुपये इतकी असून, त्यांनी तब्बल तब्बल ३ कोटी ५३ लाख रुपयांची अपसंपदा जमा केल्याचा आरोप एसीबीने केला आहे.  दरम्यान, ही अपसंपदा गेल्या १४ वर्षात जमा केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंसोबत असल्यामुळे ही कारवाई

दरम्यान, यावेळी आमदार डॉ. राजन साळवी हे म्हणाले आहेत की, “चौकशीचे परिणाम काहीही होऊ द्या, त्याला सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत आणि त्यामुळेच आमची चौकशी केली जात आहे. मात्र, आम्ही कसे आहोत, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीती आहे. माझ्या पाठिशी माझा जिल्हा आणि माझे मतदार आहे. मी जरी कारागृहात गेलो तरी उद्धव ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही. एसीबीचे हे अधिकारी कालपासूनच रत्नागिरीत आलेले आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालींची माहिती मला मिळत होती. मात्र, मी उद्धव ठाकरेंसोबत असल्यामुळे ही कारवाई सुरु आहे.(Uddhav Thackrey)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here