Gold Silver Rate Today | सोने-चांदीची ‘गूड न्यूज’; असे आहेत आजचे दर

0
4
Gold Silver Price 5 June 2024
Gold Silver Price 5 June 2024

Gold Silver Rate Today | या महिन्यात ३ जानेवारी पासूनच सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीचे सत्र सुरू होते. दरम्यान, १६ जानेवारी रोजी या घसरणीला काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, आज पुन्हा किंमती काहलि आल्या आहेत. यामुळे आता ग्राहक पुन्हा सुखावले आहेत. लग्न सराईच्या शेवटच्या दिवसांत का असेना पण सोन्याने वधू पित्यांना दिलासा दिला आहे. या घसरणीच्या काळात सोने १३०० रुपयांनी तर, चांदी ३१०० रुपयांनी खाली आले आहेत. तर, असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर….

सोन्याची घसरगुंडी 

या नव वर्षात ३ जानेवारीपासून सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण सुरु होती. दरम्यान, १२ जानेवारी रोजी १०० रुपयांनी तर १३ जानेवारी रोजी सोन्याच्या किंमतींमध्ये ३०० रुपयांनी दर वाढ झाली. या आठवड्यात १५ जानेवारी रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा १५० रुपयांची दरवाढ झाली. तर, १६ जानेवारी रोजी १०० रुपयांनी दर खाली आले. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५७,८५० असे आहेत. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,१०० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)

Gold Silver Rate Today | सोने-चांदी चमकले; असे आहेत आजचे दर

Gold Silver Rate Today | चांदीत घसरण  

गेल्या वर्षात तेजीत राहिलेल्या चांदिने या वर्षी ग्राहकांना दिलासा दिला. सोन्यापाठोपाठ चांदीतही घसरण सुरू होती. १० जानेवारी रोजी चांदीत ६०० रुपयांची दर वाढ झाली. तर, ११ आणि १२ जानेवारी रोजी चांदीचे दर हे स्थिर होते. १३ तारखेला पुन्हा ५०० रुपयांनी किंमती वाढल्या. आर, या आठवड्यात १५ जानेवारी रोजी किंमतींमध्ये ३०० रुपयांची दर वाढ झाली होती. तर तितकीच घसरण ही १६ जानेवारी रोजीही झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचे दर हे ७६,५०० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)

Gold Rate Today | आज तुमच्या शहरात असे आहेत सोने-चांदीचे दर

असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे दर 

आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये पुन्हा मोठी घसरण झाली असून, असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर…

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार,

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,२७७ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,०२८ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ५७,०४६ रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ४६,७०८ रुपये,

तर, १४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ३६,४३२ रुपयांवर पोहोचले आहे.

दरम्यान, एक किलो चांदीसाठी आता ७१,१९१ रुपये मोजावे लागणार आहेत. (Gold Silver Rate Today)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here