Nagpur | धावत्या रेल्वेच्या बाथरूममध्ये चिमुकलीवर अत्याचार

0
3
Nagpur
Nagpur

Nagpur |   राज्यात बलात्कार आणि छेडछडीची प्रकरणं ही दिवसेंदिवस वाढत असून, आता आणखी एक माणुसकीला काळीमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेत धावत्या रेल्वेत एका चिमूरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, यामुळे आता रेल्वेतही महिला सुरक्षित नाहीत का..? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.(Nagpur)

दरम्यान, या प्रकरणी धावत्या रेल्वेमध्ये लहान मुलीची छेढ काढणाऱ्या आणि रेल्वेच्या डब्यातील बाथरूममध्ये तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हा ताब्यात घेण्यात आलेला नराधम हा रेल्वेच्या एसी कोचचा अटेंडंट आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आणि त्यानंतर प्रवाशांनी आरोपीला चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, या घटनेनंतर आता रेल्वेतील महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.(Nagpur)

Rape Case | ॲपवर ओळख अन्..; शासकीय ठेकेदाराचे महिलेवर अमानुष अत्याचार

अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीचे नाव हे मोहम्मद मुन्नू उर्फ मुन्ना वल्द मोहम्मद (रा. बिहार) आहे. दरम्यान, ही ९ वर्षांची मुलगी तिच्या आई व आजीसोबत मंगळवारी ‘पाटलीपुत्र एक्स्प्रेस‘मधून प्रवास करत होती. ही चिमुरडी रेल्वे डब्ब्यातील बाथरूममध्ये गेली असता, संबंधित आरोपीही जबरदस्ती आत घुसला. बाथरूममध्ये घुसत त्याने या मुलीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीची छेढ काढली आणि तिला पैशांचे आमिष देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, मुलीने आरडाओरड करायला सुरुवात केल्यामुळे इतर प्रवाशांनी त्या दिशेने बाथरूमकडे धाव घेतली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर प्रवाशांनी आरोपी असलेल्या कोच अटेंडन्टला चोप देत पोलिसांकडे सुपूर्द केले.(Nagpur)

Rape Case | फूस लावत घरी बोलावले अन्..; मित्रांसह प्रेयसीवर अत्याचार

Nagpur | रेल्वे पोलिसांनी केले आवाहन…

दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना एक महत्वाचे आवाहन केले आहे. यानुसार “रेल्वेमधून लहान मुलांसोबत प्रवास करत असल्यास प्रवाशांनी आपल्या मुलांना एकटं सोडू नये. रेल्वेमध्ये मुलं एकटे खेळत असतील किंवा बाथरूमला जरी जात असतील तरीही त्यांना कुठेही एकटं सोडू नये. दिवसाच्या वेळी रेल्वेचे दरवाजे हे शक्यतो उघडे असतात. त्यामुळे मुलं खेळत असताना रेल्वेच्या दरवाजा पर्यंत जाऊ शकतात आणि एखादी अनुचित घटना होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो लहान मुलांसोबत प्रवास कराताना त्यांच्या पालकांनी मुलांची काळजी घेण्याचे आवाहन आता रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून करण्यात येत आहे.(Nagpur)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here