Parbhani Murder | प्रेम संबंध घरच्यांनी मान्य न केल्यास पळून जाऊन लग्न करण्याचे प्रकार मुलामुलींकडून सर्रासपणे केले जातात. मात्र, अशाच एका प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट हा परभणीत झाला आहे. या घटनेत पतीने पत्नीला भर रस्त्यात संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, या घटनेत पतीने पत्नीवर भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार करत तिची निर्घुण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात बोरी येथे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी आरोपी पतीचे नाव हे रोहित गायकवाड असे असून, तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील भूमचा आहे. आरोपी रोहित हा सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी कंपनीत कामाला होता.(Parbhani Murder)
Nagpur | धावत्या रेल्वेच्या बाथरूममध्ये चिमुकलीवर अत्याचार
Parbhani Murder | नेमकं प्रकरण काय..?
प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या अधिक महितीनुसार, आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधील बोरी येथे एका शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागच्या रस्त्यावर एक जोडपं भांडण करत चालले होते. दरम्यान, यावेळी भांडण सुरू असतानाच पतीने आपल्या जवळचा कोयता काढला आणि पत्नीवर सपासप वार केले, अशी माहिती समोर आली आहे.
हा आरोपी स्वतः पोलिसांकडे गेला आणि त्याची पत्नी तेथे रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. घटना लक्षात येताच तेथे उपस्थित आजूबाजूच्या लोकांनी तिला बोरी येथील शासकीय रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर या महिलेला परभणी येथे शासकीय रुग्णालयात हलवण्यात येणार होते. मात्र, परभणी येथे घेऊन जात असताना वाटेतच या महिलेचा मृत्यू झाला.(Parbhani Murder)
Malegaon Crime | मालेगावमधील बेपत्ता चिमूरड्याचा मृतदेह चांदवड घाटात
दोन वर्षातच प्रेमविवाहाचा भयावह शेवट
दरम्यान, सन २०२१ च्या लॉकडाऊनमध्ये या दोघं प्रेमी युगुलांनी पळून जात प्रेमविवाह केला होता. मात्र, दोन वर्षांतच पत्नी ही गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या माहेरी बोरी येथे राहत होती. तसेच तिने शाळेत नववीत प्रवेशही घेतलेला होता. तिचा पती अनेक दिवसांपासून तिला सासरी येण्यासाठी बोलावत होता. मात्र, ती सासरी जाण्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे आज सकाळीच तिचा पती रोहित गायकवाड छत्रपती संभाजीनगरवरून बोरी येथे आलेला होता.(Parbhani Murder)
पती स्वतःच कोयता घेऊन पोलिस ठाण्यात
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम