Skip to content

Malegaon Crime | मालेगावमधील बेपत्ता चिमूरड्याचा मृतदेह चांदवड घाटात

Malegaon Crime

Malegaon Crime |  नाशिक शहरासह नशिक जिल्ह्यातही आता गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, यात विशेषतः खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार नितेश राणे यांनी मालेगाव मधील (Malegaon Crime) गुन्ह्यांच्या घटना पाहता तेथे वेगळे पोलिस आयुक्तालय उभारण्याची मागणी केली होती.

दरम्यान, अशातच आता मालेगाव मधून माणुसकीला काळीमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. मालेगाव शहरातून गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ६ वर्षीय मोहम्मद कैफ या चिमूरड्याचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या राहूड घाटातील जंगलात आज आढळून आला आहे. दरम्यान, चांदवड पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. हा मुलगा मालेगाव शहरामधून गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता होता. या घटनेने परिसरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.(Malegaon Crime)

मालेगाव शहरातील आयेशानगर पोलिस ठाण्यात मृत ६ वर्षीय बालक मोहम्मद कैफ याच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केलेली होती. मालेगाव शहरामधून बेपत्ता झालेला हा बालक चांदवडपर्यंत कसा पोहोचला ? त्याचे अपहरण करण्यात आले होते का ?, त्याच्या बेपत्ता होण्यामागीळ नेमके कारण काय ? आणि त्याचा मृतदेह हा अशा अवस्थेत घाटात आढळल्याने या बालकाचा घातपात किंवा खून झाला आहे का ?.

Malegaon News | …. यामुळे पालकमंत्र्यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी

त्याचा घातपात करण्यामागचे नेमके कारण काय ?. या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मृत बालक मोहम्मद कैफ याच्या कुटुंबियांकडून त्याची हत्या झालेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दारम्यान, मालेगाव मधील  आयेशानगर पोलीस या घटनेचा पुढील सविस्तर तपास करीत आहेत.(Malegaon Crime)

Malegaon Crime | काय म्हणाले होते नितेश राणे..?

मालेगाव परिमंडळातील पोलीस अहवालानुसार २००१ ते २०२३ पर्यंत मालेगाव मध्ये तब्बल १८८ दंग्याच्या घटना झाल्या असुन, त्यामध्ये दोन मुख्य बॉम्बस्फोट व अन्य लुटालूट, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दुकान फोडी, घरे जाळणे वस्ती जाळणे, उद्योगांना क्षती पोहोचवणे अशा स्वरूपाच्या अनेक घटना या नमूद केलेल्या आहेत.

Malegaon | धक्कादायक! मालेगाव महापालिकेची 3 गोण्या भरून कागदपत्रं रस्त्यावर

मालेगाव हे राज्यातील संवेदनशील शहर असून, त्यामुळे मालेगाव शहराचा समतोल विकास साधण्यासाठी येथे नवीन आणि वेगळे पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मालेगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मालेगावमध्ये नवे पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी पत्राद्वारे आमदार नितेश राणे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.(Malegaon Crime)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!