Skip to content

Marriage | लग्नासाठी कोणी मुलगी देईनात; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Marriage

Marriage |  सध्याच्या काळात मुलींचे प्रमाण घटल्याने विवाहयोग्य तरुण हे बिन लग्नाचे आहेत. दरम्यान, यामुळे अनेक तरुणांचे वय निघून गेली तरी त्यांना लग्नासाठी मुली भेटत नसल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात एका तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने तो नैराश्यात गेला आणि त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.(Marriage)

ही घटना कर्नाटक मधील कुडलिगी तालुक्यातील गुडेकोटे या गावातील असून, येथेच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अधिक माहितीनुसार, ह अटारून २६ वर्षांचा होता. मात्र, याचे लग्न जमत नसल्यामुळे तो त्रस्त झाला होता. यामुळे तो व्यसनाच्या आहारी गला होता. याचमुळे त्याने विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. या प्रकारणामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Sucide News | प्रेयसीच्या शॉपिंगच्या हट्टामुळे तरूणाने उचललं टोकाचं पाऊल

या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे आत्महत्या केल्यामुळे कुटुंबियांमध्ये दु:खाचं वातावरण आहे. गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचे लग्न जमत नव्हते. त्याला कोणी लग्नासाठी मुलगी देत नव्हते. म्हणून तो नैराश्यात होता.(Marriage)

तसेच यामुळे त्याला दारुच्या आणि इतर व्यसनांच्याही आहारी गेला होता. लग्नाच्या चिंतेत हा मृत तरुण रोज दारु पीत होता. याच  नैराश्यातून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी या तरुणाच्या मृत्यूचं कारण हे आत्महत्या असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. गावातील आणि कुटुंबातील लोकांचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. आत्महत्येचं कारण हे लग्न न जमने हेच आहे की इतर काही ? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.(Marriage)

Marriage | अनेक दिवसांपासून नैराश्यग्रस्त

अधिक माहितीनुसार, गुडेकोटे गावातील या २६ वर्षीय मृत तरुणाचे नाव हे बी. मधुसूदन असे असून,  हा लग्न जमत नसल्यामुळे वैतागलेला होता. त्याची कुठेही सोयरीक जुळत नव्हती. दरम्यान, लग्न जमत नसल्यामुळे मधुसूदन मानसिकरित्या पूर्णपणे खचला होता. याच कारणामुळे त्याला दारुचेही व्यसन लागले होते. तो पूर्णपणे दारुच्या आहारी गेला होता. याचमुळे त्याला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं.(Marriage)

 

विश प्राशन करताना सांगितले… 

अधिक माहितीनुसार, मधुसूदन याने विष प्राशन केले. त्यानंतर त्याची तब्येत खालावल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  डॉक्टरांनी मधुसूदन याच्या उपचार सुरु केले. पण प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे मधुसूदन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. विष प्राशन करताना त्याने लग्न होत नाही म्हणून आयुष्य संपवत असल्याचे सांगितले होते.  दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.(Marriage)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!