Lok Sabha Election | सरकारची निवडणुक घाई; दोन दिवसांत ‘जीआर’चा धडाका

0
4
Maharashtra Politics
Maharashtra Politics

Lok Sabha Election |  लोकसभा निवडणुकांच्या तारखा या १४ मार्च रोजी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर, काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले होते. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता असून, त्यामुळे आता आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच राज्य सरकारने जीआरचा धडाका सुरू केला आहे. गेल्या केवळ दोन दिवसांतच महाराष्ट्र सरकारने एकूण २६९ शासन निर्णय घेतले आहे. (Lok Sabha Election)

दरम्यान, राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील काही प्रलंबित कामे, आणि निधींची पूर्तता अशा शासन निर्णयांचा समावेश करण्यात आला आहे. तर, आचारसंहितेपूर्वी प्रचाराचा सिक्सर मारण्याची सरकारची तयारी असून, सरकार दरबारी आता निवडणूक घाई सुरू असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता ही आता कुठल्याही क्षणी लागू शकते आणि त्यामुळेच राज्य सरकारने गेल्या ६ व ७ मार्च या दोन दिवसातच तब्बल २६९ शासन निर्णय घेतले आहेत. यानुसार ६ मार्च रोजी ९६ शासन निर्णय आणि ७ मार्च रोजी १७३ शासन निर्णय घेण्यात आले आहेत. (Lok Sabha Election)

Lok Sabha Election | मध्यरात्री ठरला महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला; असा सुटला तिढा..?

Lok Sabha Election | हे निर्णय पारित 

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू शकते. दरम्यान, एकडा की निवडणुकीची आचारसंहिता लागली तर सर्व कामे ठप्प होतील असे होऊ नये म्हणून आणि ८,९ व १० मार्च रोजी सलग सुट्ट्या असल्यामुळे ६ व ७ मार्च रोजी हे शासन निर्णय तातडीने जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. (Lok Sabha Election)

तर, या २६९ शासन निर्णयांमध्ये प्रामुख्याने निधी वितरणाचे शासन निर्णय, आणि राज्य उत्पादन शुल्क यासारखे महत्त्वाचे  निर्णय घेण्यात आले असून, पदस्थापना, तसेच कोकणातील काही महत्वाच्या योजनांना मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच केवळ जीआरच नाहीतर आता मंत्रीमंडळांच्या बैठकींचाही धडाका लागणार आहे. तर, येत्या सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतली जाणार असल्याचीही माहिती आहे. (Lok Sabha Election)

Lok Sabha Elections Date | आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा…

निवडणुकांपूर्वी आश्वासन पूर्ण करण्याची लगबग 

आचारसंहिता लागू झाल्यास कुठल्याही नवीन विकास कामांची घोषणा करता येणार नसल्यामुळे राज्य सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासन निर्णयांचा धडाका लावला आहे. तर, या निवडणुकीच्या आधी जनतेला दिलेले किमान आश्वासनांची पूर्तता केल्यास त्यावरून प्रचार करता येईल. यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या आधी असे काही निर्णय सरकारकडून घेतले जातात. (Lok Sabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here