Skip to content

Bharat Jodo Yatra | राहुल गांधींची यात्रा नाशकात; शरद पवार आणि आदित्य ठाकरेही देणार साथ

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, राज्यासह केंद्रीय मंत्र्यांकडूनही नाशिकला महत्त्व दिले जात आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर आता अनेक केंद्रीय तथा राज्य मंत्री नाशिक दौरे करत असून काळाराम मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. यातच आता भर पडलीय ती कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ही १३ व १४ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात दाखल होत असून, यात राहुल गांधी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गट युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचीही साथ मिळणार आहे.(Bharat Jodo Yatra)

Bharat Jodo Yatra | राहुल गांधींनी साधली संधी 

दरम्यान, नाशिक हा प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा असून, सध्या देशात कांदा निर्यात बंदी लागू असल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याच संधीचे सोने करण्यासाठी राहुल गांधी हे नाशिकमध्ये येऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. यासाठी त्यांनी निवड केलीय ती नाशिकमधील सर्वात जास्त कांदा उत्पादक शेतकरी असलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ‘चांदवड’ तालुक्याची. येथे शरद पवारदेखील राहुल गांधी यांच्या चांदवड येथील शेतकऱ्यांच्या सभेत सहभागी होणार असून, युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे त्यांच्या नाशिक शहरातील रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत.(Bharat Jodo Yatra)

Rahul Gandhi | नशिक कोर्टाने ठोठावली राहुल गांधींना नोटिस

असा आहे राहुल गांधी यांचा नाशिक दौरा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने मालेगाव येथे १३ मार्च रोजी राहुल गांधी येणार आहेत. तेथे ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर रात्री ते सौंदाणे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात मुक्काम करतील आणि १४ मार्चला सकाळी ८ वाजता चांदवडमध्ये दाखल होणार आहेत. यानंतर ते चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे त्यांचा रोड शो होईल. दुपारी २.३० वाजता ते नाशिकमध्ये येतील. नाशिकमध्ये त्यांचा पुन्हा रोड शो होईल. नाशिकमधील चौकातील इंदिरा गांधी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील आणि पंचवटी येथे काळाराम मंदिरात दर्शन घेतील. (Bharat Jodo Yatra)

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक

असा आहे शरद पवारांचा नाशिक दौरा 

काळाराम मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर ते पुढे त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन जव्हारच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील १३ व १४ मार्च रोजी दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. १३ मार्चला त्यांची निफाड येथे सभा होत असून, त्यानंतर ते नाशिकमध्ये मुक्कामी असतील.

१४ मार्चला ते चांदवड येथे राहुल गांधींच्या सभेत सहभागी होणार असून, या शेतकरी संवादासाठी शरद पवार यांच्यासह आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीचेही नियोजन ठाकरे गटाकडून केले जात आहे. दरम्यान, यामुळे नाशिकमद्धी यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असून, त्यामुळे या यात्रेत नेमके काय होणार आणि कोण काय भूमिका मंडणार हे पहावे लागणार आहे. (Bharat Jodo Yatra)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!