सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील पिंपळगाव (वा) येथे एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. एकलव्य जयंतीचे औचित्य साधून याठिकाणी एकलव्य भिल्ल सेना (वायबीएस) शाखेची स्थापना करण्यात आली. या नामफलकाचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष व देवळ्याचे माजी सरपंच रघु नवरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच प्रमाणे तालुक्यात इतरही ठिकाणी एकलव्य जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मिरवणुका काढण्यात आल्या. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पिंपळगाव येथे शाखा अध्यक्ष दादाजी जाधव, उपाध्यक्ष प्रकाश जाधव, सरचिटणीस अंबादास आहिरे, कोषाध्यक्ष साईनाथ जाधव, संघटक भाऊसाहेब जाधव, शांताराम जाधव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम